Shahaji Bapu Patil  Team Lokshahi
राजकारण

ज्यांची संस्कृती खोक्यांची तेच खोक्यांवरून टीका करतात, शहाजी पाटलांचा ठाकरेंवर निशाणा

कॉंग्रेस आमदारही फुटणार, शहाजी पाटलांचा गौप्यस्फोट

Published by : Shubham Tate

Shahiji Patal udhav thackeray : राज्यात एकीकडे राजकीय खळबळ सुरू असताना नुकतेच पावसाळी अधिवेशन पार पडले. या अधिवेशात शिवसेनेतून बंडखोरी केलेल्या आमदारांवर विरोधकांनी जोरदार निशाणा साधला होता. अधिवेशनातील विरोधकांच्या टीका चांगल्याच गाजल्या. सोबतच भाजपकडून खोकी घेतल्यामुळेच शिंदे गटाने बंड केल्याचा आरोप शिवसेनेकडून वारंवार केला जात आहे. आजही शिवसेनेने आपल्या मुखपत्रातून हा आरोप केला आहे. शिंदे गटाकडूनही खोक्यांच्या मुद्द्यावरून शिवसेनेवर टीका करण्यात येत आहे. शिंदे गटाचे आमदार शहाजी बापू पाटील यांनी आता शिवसेनेवर निशाणा साधला आहे. (Shahiji Patal target on udhav thackeray)

प्रवृत्ती खोक्यांची तेच खोक्यावर बोलतात

वारंवार विरोधकांकडून आणि सामन्यातून शिंदे गटावर 50 खोक्यांवर होणाऱ्या टीकेवर आता शिंदे गटाचे आमदार शहाजी पाटील यांनी बोचरी टीका केली आहे. अचानक पडलेल्या दणक्यामुळे अजून त्यांची नशा उतरलेली नाही. त्यामुळे समोरच्याला खोकी संघटना दिसत आहे. ज्यांची प्रवृत्ती खोक्यांचीच आहे तेच खोक्यावर बोलतात. ज्यांचं आयुष्य खोक्यात गेलं. त्यांनाच खोकी दिसणार. ज्यांची खोकी संस्कृती तेच टीका करतात. सामनातून लिहितात, हे चुकीचं आहे, काही लोक आज पातळी सोडून राजकारण करताना दिसत आहेत. त्यामुळे खोक्यांवरून वारंवार टीका करत आहेत, असं त्यांनी सांगितलं. दरम्यान, त्यांनी शिवसेनेच्या दसरा मेळाव्यावर काहीही बोलण्यास स्पष्ट नकार दिला.

कॉंग्रेस नेत्यांवरही दिली प्रतिक्रिया

कॉंग्रेस नेत्यांनी राज्यातील भाजपच्या प्रमुख नेत्यांची भेट घेतल्यानंतर आता शिवसेनेनंतर कॉंग्रेसचे आमदार फुटणार असल्याची चर्चा रंगली असताना शहाजी पाटील यांनी खळबळ उडवणारे वक्तव्य केलं आहे. माध्यमांनी त्यांना कॉंग्रेस नेत्यांच्या भेटीवर विचारलं असता ते म्हणाले की, काँग्रेसचे आमदार फुटणार की नाही हे मला माहीत नाही. पण काँग्रेसच्या आमदारांमध्ये नाराजी निश्चित आहे, असं सांगून पाटील यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा