sharad Pawar| Shiv Sena | Uddhav Thackeray | Suhas Kande team lokshahi
राजकारण

'उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री केल्यावर सेना फुटेल हे पवारांना माहिती होतं'

सुहास कांदेंचा ताफा पिंपळगाव टोलनाक्यावर अडवला

Published by : Shubham Tate

Suhas Kande : उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री केल्यावर शिवसेना फुटेल हे शरद पवारांना माहिती होतं. त्यामुळेच ही रणिनीती आखली गेल्याचा गंभीर आरोप नाशिकचे आमदार सुहास कांदे यांनी केला आहे. एकनाथ शिंदे गटात गेलेल्या सुहास कांदे यांनी आदित्य ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांच्यावर एकानंतर एक गंभीर आरोप केले आहेत. (sharad Pawar knew that Shiv Sena would split after making Uddhav Thackeray the chief minister, Suhas Kande)

आदित्य ठाकरे हे आज शिवसंवाद यात्रेनिमित्त नाशिक दौऱ्यावर आहेत. यावेळी सुहास कांदे यांनी त्यांना आव्हान दिलं आहे. आदित्य ठाकरे यांचा मनमाडमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला असतानाच मनमाडमध्ये सुहास कांदे यांनीही शिवसैनिकांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी उद्धव ठाकरेंच्या रणनितीवर आरोप केले.

शिंदे हे गडचिरोलीचे पालकमंत्री असताना काही नक्षलवादी मारले गेले. त्यानंतर त्यांना झेड प्लस सुरक्षा देण्याचे मान्य झाले. मात्र, शिंदे यांना झेड प्लस सुरक्षा देऊ नका, असा आदेश गृहराज्यमंत्री शंभुराजे देसाई यांना सकाळी 8.30 वाजता वर्षावरुन आला. वयाच्या 16 व्या वर्षापासून शिंदे हे शिवसेनेचे काम करत आहेत. दिघेसाहेबांचे विचार. हिंदुत्वाचे विचार आणि बाळासाहेब यांचे विचार पुढे नेले. शिवसेना मोठी केली. शिवसेना मोठी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचा खून करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना तुम्ही मदत करणार होता का? याचा अर्थ तुम्ही हिंदुविरोधी कृती केली, असा थेट आरोप सुहास कांदे यांनी केला.

दरम्यान, आमदार कांदे नाशिकहून आपल्या नाशिकच्या समर्थकांसह मनमाडला निघाले होते. त्यांच्या समवेत वीस ते बावीस वाहने होते. ही वाहने पिंपळगाव बसवंत टोल नाक्यावर आले असता तेथे आधीच शिवसेनेचे स्थानिक कार्यकर्ते जमले होते. त्यांनी हा ताफा अडवला. यावेळी कांदे वाहनातून उतरण्याचा प्रयत्न करीत होते. मात्र पोलिसांनी त्यांनी पुन्हा गाडीत बसवले. यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात घोषणा दिल्या. कांदे यांच्याबाबत त्यांनी संतप्त प्रतिक्रीया व्यक्त केल्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : जास्त नाटकं केल्यास कानाखाली आवाज काढलाच पाहिजे - राज ठाकरे

Latest Marathi News Update live : व्यावसायिक सुशील केडियाने मागितली माफी

Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : उद्धव-राज ठाकरे एकत्र येण्यावर मराठी कलाकारांची भावनिक प्रतिक्रिया

Raj Thackeray - Uddhav Thackeray : मेळाव्यासाठी अभूतपूर्व गर्दी, पूर्ण क्षमतेने भरला वरळी डोम; राज - उद्धव यांना ऐकण्यास कार्यकर्ते उत्सुक