राजकारण

एकनाथ शिंदेची भेट का घेतली? खुद्द शरद पवारांनीच सांगितले कारण

शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर शरद पवारांनी भेट घेतली आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : राज्यात राजकीय वर्तुळात सध्या मोठ्या प्रमाणात उलथा-पालथ सुरु आहे. अशातच, राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली आहेत. मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान वर्षा बंगल्यावर शरद पवारांनी भेट घेतली आहेत. अर्ध्या तासांहून अधिक वेळ दोघांमध्ये बंद दाराआड चर्चा झाली आहे. याबाबत आता शरद पवारांनी स्वतःच सांगितले आहे.

मराठा मंदिर, मुंबई संस्थेच्या अमृत महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त वर्धापन सोहळ्याचे आयोजन संस्थेतर्फे करण्यात येणार आहे. संस्थेचा अध्यक्ष या नात्याने आज महाराष्ट्राचे माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या कार्यक्रमाला आमंत्रित करण्यासाठी वर्षा या त्यांच्या शासकीय निवासस्थानी त्यांची भेट घेतली असल्याचे शरद पवार यांनी सांगितले.

यासोबतच महाराष्ट्रातील मराठी चित्रपट, नाट्य व कला क्षेत्रातील कलावंत, कारागीर यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी बैठक आयोजित करण्याबाबत व सदर बैठकीस चित्रपट, नाट्य, लोककला, वाहिन्या व इतर मनोरंजन माध्यमांतील संघटनांना निमंत्रित करण्याबाबत मुख्यमंत्री यांच्याशी चर्चा केली, असेही त्यांनी म्हंटले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा

Sanjay Shirsat On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "पडझड ही उबाठा गटाची झाली, राज ठाकरेंची नाही"

Raj Thackeray On Devendra Fadnavis : "माझे वडील आणि काका इंग्रजीत शिकले पण..." फडणवीसांच्या टीकेला राज ठाकरेंकडून सडेतोड उत्तर