Sushma Andhare Team Lokshahi
राजकारण

माझ्या जीवाला धोका - सुषमा अंधारे

सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची माहिती समोर आली आहे. स्वत: सुषमा अंधारे यांनी याबाबत माहिती दिली आहे.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गोंधळ सुरु असताना, बंडखोरीनंतर ठाकरे गट आणि शिंदे गटातील वाद उफाळतच चालला आहे. सध्या दोन्ही गटाकडून जोरदार आरोप- प्रत्यारोप सुरु असताना, ठाण्यातील कार्यक्रमात शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची नक्कल केली होती.सोबतच त्यांनी शिंदे गटावर देखील जोरदार टीका केली होती. या प्रकरणी आता त्यांच्यासह आणखी ठाकरे गटाच्या सहा नेत्यांविरोधात प्रक्षोभक भाषण केल्या प्रकरणी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. यानंतर सुषमा अंधारे यांच्या जीवाला धोका असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

सुषमा अंधारे यांनी स्वतः ही माहिती माध्यमांना दिली आहे. त्या म्हणाल्या की, माझ्या जीवाला धोका आहे, बाहेर पडू नका असे इनपुट मला आले. माझ्यावरती केस किंवा हल्ला होऊ शकतो अशी माहिती मला देण्यात आल्याचे माहिती सुषमा अंधारे यांनी माध्यमांना सांगितली आहे. त्यानंतर माध्यमांनी अंधारे यांना पोलिस संरक्षणाची विचारणा केली असता. त्या म्हणाल्या की, मी या इनपूटकडे लक्ष न देता माझे काम करत राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट सांगितले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Imran Khan : इम्रान खान यांना मोठा दिलासा; जामीन मंजूर

Palna Yojana : लाडक्या नोकरदार महिलांच्या मुलांसाठी राज्यात पाळणा योजना; नेमकी काय आहे 'ही' योजना

Pune : पुण्यातील रस्त्यावर चक्क मानवी सांगाडा?

Latest Marathi News Update live : मनसेचे नेते संदीप देशपांडे यांची आज पत्रकार परिषद