राजकारण

Shivendraraj Bhosale | 'उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील'

खासदार उदयनराजे भोसले यांनी केलेल्या टीकेला आमदार शिवेंद्रराजे भोसले यांनी पत्रकाद्वारे प्रत्युत्तर दिले आहे

Published by : Shweta Chavan-Zagade

प्रशांत जगताप | सातारा : शासन स्तरावर विविध विकास कामांसाठी पाठपुरावा करणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्यच आहे, त्यात नवीन असे काहीच नाही. तुम्ही 15 वर्षे खासदार होता, त्यावेळी कार्यबाहुल्याच्या नावाखाली संसदेत एक दिवसही उपस्थित नव्हता. त्यावेळी का असे फोटोसेशन होत नव्हते? दिल्लीत केंद्राच्या विविध मंत्र्यांना भेटून फोटोसेशन करायचे. निवेदन देऊन शेकडो कोटी निधींचे आकडे पेपरमध्ये छापून आणायचे. पण खरच किती निधी आणला? आणि तुम्ही एवढे मोठे महान विकास पुरुष आहात तर सातारा लोकसभेला तुमचा पराभव करून जनतेने तुम्हाला तुम्ही केलेल्या भरीव विकासाची पोचपावती का दिली? असा खोचक सवाल आमदार शिवेंद्रराजे भोसले (Shivendraraj Bhosale) यांनी उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) यांना केला असून दुसऱ्याकडे बोट दाखवून स्वतः केलेली कुकर्म लपत नाहीत. उदयनराजेंच्या भ्रष्ट कारभाराचा हिशोब सातारकर नक्कीच करतील असेही त्यांनी पत्रकात म्हटले आहे.

पालिकेच्या कार्यकाळास चार वर्ष आणि दहा महिने उलटले. निवडणूक लागली की बरं तुम्हाला केंद्रीय मंत्र्यांची आठवण होते? शेवटच्या महिन्यातच बरं विकास कामांचा पाठपुरावा सुरू होतो. मोठमोठ्या घोषणा होतात आणि याचेच कुतुहल सातारकरांना आहे.

कास धरणाची उंची आमच्यामुळे वाढली हे तुम्ही पत्रकातून स्वतः कबूल केले त्यामुळे याबद्दल तुमचे आभार मानले पाहिजेत.. पहिल्यांदा तुम्ही खासदार झाला त्यावेळी रेल्वेतून कराडला गेला.. आपल्या माहुलीच्या रेल्वे स्टेशनवर मोठा स्टंट केला. पुढे कराड आणि माऊली या दोन्ही स्टेशनचा काय कायापालट केलात? केवळ शो'बाजी केली. काहीतरी बदल झाला का? पंधरा वर्षे खासदार होता पण केंद्र सरकारच्या माध्यमातून सातारा अथवा कराडवरून साधी नवीन जलद रेल्वे तुम्हाला सुरू करता आली नाही असा टोलाही आमदार शिवेंद्रराजेंनी लगावला आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा