shivsainiks attack on deepak kesarkar  team lokshahi
राजकारण

दीपक केसरकरांनी सांगितली शिंदे गटाची भूमिका अन् सावंतवाडीत शिवसैनिकांनी केला राडा

एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांची कार्यालये शिवसैनिकांनी फोडली

Published by : Shubham Tate

shivsainiks attack on deepak kesarkar : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) व त्यांच्यासोबतचे ४० बंडखोर आमदार तसेच शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे असे शिवसेनेत उघड दोन गट पडले आहेत. एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यभरातील शिवसैनिक आक्रमक झाले असून बंडखोर आमदारांची कार्यालयेदेखील फोडण्यात येत आहेत. शिवसैनिकांची हीच आक्रमकता लक्षात घेऊन राज्यातील पोलीस यंत्रणा सतर्क झाली असून ठिकठिकाणी सुरुक्षा वाढवण्यात आली आहे. (shivsainiks attack on deepak kesarkar office in sawantwadi eknath shinde)

दीपक केसरकर यांनी काही तासांपूर्वीच पत्रकार परिषद घेत शिंदे गटाची भूमिका स्पष्ट केली होती. त्यानंतर संध्याकाळी केसरकर यांच्या सावंतवाडीतील कार्यालयावर शिवसैनिकांनी हल्ला केला. दरम्यान, शिवसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एकनाथ शिंदे यांच्या बंडाळीनंतर राज्यभरात शिवसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. शिंदे यांच्यासोबत गुवाहाटीत असलेल्या बंडखोर आमदारांच्या कार्यालयावर हल्ल्याची मालिका सुरु झालीय. मुंबईत मंगेश कुडाळकर, सदा सरवणकर, पुण्यात तानाजी सावंत, उल्हासनगरमध्ये एकनाथ शिंदे यांच्यासह अनेकांची कार्यालये शिवसैनिकांनी फोडली आहेत.

दरम्यान, अशातच अशातच काल रात्री गुजरातमध्ये एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis) यांची भेट झाल्याची माहिती विश्वसनीय सुत्रांनी दिली आहे. सध्या शिंदे हे गुवाहाटीमध्ये जवळपास 40 आमदारांसह तळ ठोकून आहेत. गुवाहाटीवरुन काल रात्री शिंदे गुजरातमध्ये (Gujrat) आले होते. तर फडणवीस देखील रात्री गुजरातमध्ये दाखल झाल्याची माहिती दिली आहे. गुजरातमध्ये बडोद्यात ही भेट झाल्याचे सांगण्यात येते आहे. या बैठकीत राज्यात पुढे काय घडेल, राज्यात पुढे जाऊन कशी सत्ता स्थापन करायची यावर चर्चा झाल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू