Uddhav Thackeray | Bhagatsingh Koshyari Team Lokshahi
राजकारण

तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेलं आहे त्याचा मान मी राखू शकत नाही, ठाकरेंची राज्यपालांवर टीका

मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा अगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून मी त्यांचा मान राखू शकतो.

Published by : Sagar Pradhan

राज्यात सध्या प्रचंड राजकीय गदारोळ सुरु आहे. याच गदारोळा दरम्यान आता शिंदे गट पुन्हा एकदा गुवाहाटी दौऱ्यावर आहेत, तर दुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाचा बुलढाण्यात शेतकरी मेळावा पार पडला. यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी विरोधकांना चांगेलच धारेवर धरले. राज्यपाल भगतसिंग कोश्यारी याच्या विधानामुळे राज्यात घमासान सुरु आहे. त्याच विधानावर बोलताना उद्धव ठाकरेंनी राज्यपालांवर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले उद्धव ठाकरे?

राज्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या विधानामुळे रान पेटले आहे. त्यावरच बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, “मिंदे सरकारने राज्यपालांचा निषेध करण्याऐवजी त्यांची बॅग पॅक करून त्यांना पाठवून देण्याची हिंमत दाखवायला हवी होती. आम्ही ज्या त्वेषाने बोललो. त्या त्वेषाने बोलले का नाही? मी मुख्यमंत्री असताना राज्यपालांचा अगाऊपणा सहन करत नव्हतो. राज्यपाल म्हणून मी त्यांचा मान राखू शकतो. पण तुमच्या काळ्या टोपीखाली जे काही दडलेलं आहे त्याचा मान मी राखू शकत नाही”, तुम्ही महाराजांचा अवमान करत असाल तर तुमचं वय किती असेल तर तुम्ही घरात बसा. आम्ही सहन करणार नाही. महाराज जुने आदर्श कसे होऊ शकतात?, असा घणाघात उद्धव ठाकरेंनी यावेळी राज्यपालांवर केला.

पुढे ते म्हणाले की, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह म्हणाले गुजरातमध्ये दंगलखोरांना आम्ही धडा शिकवला. त्यानंतर एकही दंगल झाली नाही. पण ९२मध्ये बाबरी पडली. त्यानंतर जी दंगल झाली त्यावेळी तुम्ही बिळात पडत होता. तेव्हा शिवसेना उभी होती. अमरनाथ यात्रा शिवसेनेनेच सुरू केली. २००३ मध्ये तुम्ही धडा शिकवू शकलात ते जिजाऊच्या पोटी आमचं दैवत जन्माला आलं म्हणून. ते नसते तर तुमचं नावही भलतंच झालं असतं, अशी टीका उद्धव ठाकरेंनी यावेळी अमित शाह यांच्यावर केली.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Swanandi Berde Laxmikant Berde's Daughter : लक्ष्मीकांत बेर्डे यांची लेक आता व्यावसायिका; 'या' ज्वेलरी ब्रँडची घोषणा

Bail Pola Festival : राज्यात बैलपोळ्याचा उत्सव साजरा, शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण

Sharad Pawar : "आम्हाला मुख्यमंत्र्यांचा फोन आला, पण...ते आमच्या विचारांचे नाहीत" फडणवीसांनी केलेल्या फोनवरुन शरद पवार स्पष्टच बोलले

Laxman Hake Viral Video : "मी असं म्हणायला वेडा नाही..." माळी समाजावरुन केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर लक्ष्मण हाकेंचा आता वेगळाच दावा