राजकारण

उद्धव ठाकरेंवर जसा परिणाम झालाय तसाच रोहित पवारांवर; कोणी केली टीका?

दहा-बारा दिवसात गेलेले आमदार परत येतील, तुम्हाला चित्र वेगळे दिसेल, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

अहमदनगर : दहा-बारा दिवसात गेलेले आमदार परत येतील, तुम्हाला चित्र वेगळे दिसेल, असं वक्तव्य रोहित पवारांनी केलं होतं. त्यावरून भाजप नेते सुजय विखे यांनी टोला लगावला आहे. उद्धव ठाकरेंवर जसा परिणाम झालाय तसाच रोहित पवारांवर झाला आहे, असा निशाणा सुजय विखेंनी साधला आहे. जी काय परिस्थिती निर्माण झाली त्यात त्यांचाही मोठा वाटा असल्याचं त्यांनी म्हटलंय. तसेच, लोकसभा निवडणुकीत होऊन जाईन मात्र आमदार परत जाणार नाहीत, असा दावा त्यांनी केला आहे.

ज्या पद्धतीने राजकारण सुरू आहे या राजकारणात तरुणांनी यावा की नाही, असं वक्तव्य आमदार रोहित पवारांनी केलं होतं. त्यावरून सुजय विखे यांनी टोला लागलाय. आधी ते राजकारण सोडणार का याची भूमिका त्यांनी जाहीर करावी, असं अहवान त्यांनी केला आहे.

तसेच रोहित पवारांनी अजित पवारांसोबत गेलेल्या ज्येष्ठ नेत्यांवर टीका केली होती, त्यावरून देखील सुजय विखे यांनी निशाणा साधला आहे. जेवढा आमचं वय नाही तेवढे त्यांचे राजकारण झालं असून त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा पक्षावर टीका करावी. कोणाला काय दिलं काही नाही यावर बोलू नये. तर ते का गेले याचा विचार करावा अस सुजय विखे यांनी म्हटलंय.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; आजही विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Maharashtra Assembly Monsoon Session : पावसाळी अधिवेशनाचा आज दुसरा आठवडा; विरोधक सत्ताधाऱ्यांना घेरण्याच्या तयारीत

Raigad : रायगडमध्ये समुद्रात संशयास्पद बोट आढळली; सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर

Navi Mumbai : नवी मुंबईतील तुर्भेच्या गोडाऊनला भीषण आग