Eknath Shinde and Uddhav Thackeray  Team Lokshahi
राजकारण

Eknath shinde vs shiv sena : सुनावणीकडे देशासह महाराष्ट्राचं लक्ष, कोणाला 'सर्वोच्च' दिलासा?

अटकेमुळे महत्त्वाची बातमी झाकली गेली , अरविंद सावंत

Published by : Team Lokshahi

supreme court : उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेतून बाहेर पडलेल्यांनी पक्षांतर बंदी कायद्यानुसार, दुसऱ्या पक्षात विलीन व्हावं, हाच एक पर्याय असल्याचा युक्तिवाद कपिल सिब्बल यांनी केला. तर आम्ही पक्ष सोडलाच नसल्याने पक्षांतर बंदी कायदा आम्हाला लागूच होत नसल्याचा युक्तिवाद हरिश साळवे यांनी केला. दरम्यान, सुप्रीम कोर्टातील या याचिकांवरील सुनावणी आज कोर्टाच्या पटलावर पहिल्याच क्रमांकावर ही याचिका सुनावणी होणार आहे, असे न्यायमूर्तींनी जाहीर केले. (supreme court on Eknath shinde vs shiv sena)

महाराष्ट्रातील सत्तासंघर्षावरील कालचा युक्तिवाद पूर्ण झाला असून आज पुन्हा सुनावणी होणार आहे. आज सकाळी हे पहिल्या क्रमांकाचं प्रकरण असेल, असं सरन्यायाधीश रमण्णा यांनी स्पष्ट केलं होतं.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांची महत्त्वाची बैठक बुधवारी बोलवली होती. शिवसेना खासदार संजय राऊत यांना ईडीने अटक केल्यानंतर आता पक्षाची पुढची भूमिका कशी असेल तसेच भाजपला शह देण्यासाठी काय रणनिती असायला हवी यावर या बैठकीत प्रामुख्याने चर्चा करण्यात आल्याचे समजते. या बैठकीनंतर खासदार अरविंद सावंत यांनी माध्यमांशी संवाद साधला.

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी सातत्याने राज्याचा अपमान करत आहेत. त्यांच्याविरोधीत असंतोष आहे. तो असंतोष दडपण्यासाठी संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्यात आली. आम्ही प्रवक्ते आहोत, आता काही पोपट झालेत जे रोज काहीतरी बोलत असतात. मूळ मुद्द्याला बगल देण्याचा प्रयत्न होत आहे. राज्यपालांनी राज्याचा अपमान केला आहे. जाती-जातींमध्ये दुही पसरवण्याचे काम त्यांनी केले. याबद्दल चर्चा सुरू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी राऊत यांना अटक झाली आणि मुद्दा भरकटवण्याचा प्रयत्न झाला. राऊत यांच्या अटकेमुळे महत्त्वाची बातमी झाकली गेली असे सावंत म्हणाले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा