राजकारण

एखाद्या महिलेबद्दल बोलताना लाख वेळा...; सुषमा अंधारेंचा शिरसाटांवर निशाणा

शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांच्या वक्तव्यानंतर ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे आक्रमक झाल्या आहेत. संजय शिरसाटांवर अब्रुनुकसानीच्या दाव्यावर ठाम असल्याचं त्यांनी म्हटलंय. त्या बीड येथे पत्रकार परिषदेत बोलत होत्या. एखाद्या महिलेबद्दल बोलताना त्यांनी लाख वेळा विचार केला पाहिजे, असंही त्यांनी म्हंटले आहे.

संजय शिरसाठ यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर सुषमा अंधारे यांनी परळी मध्ये पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. या पत्रकार परिषदेतून अंधारे यांनी संजय शिरसाठ यांना लक्ष्य केले आहे. शिंदे आणि फडणवीस यांच्यावर विश्वास असून त्याच्या मस्तवाल लोकप्रतिनिधींना किमान आता तरी सुधारवाल आणि त्यांच्यावर योग्य ती कारवाई करावी. मात्र त्यांनी कारवाई नाही केली तरी अब्रू नुकसानीचा दावा करणार असल्याचं त्यांनी यावेळी स्पष्ट केलं.

माझी लढाई लढण्यासाठी मी खंबीर आहे. आणि यासाठी मला काही वेगळ्या गोष्टी करावे लागतील असं वाटत नाही. एखाद्या महिलांबद्दल बोलताना त्यांनी लाख वेळा विचार केला पाहिजे, असे देखील सुषमा अंधारेंनी म्हंटले आहे.

दरम्यान, आम्ही आमची ३८ वर्षे शिवसेनेसाठी घालवली. आता तुम्ही येऊन आम्हाला मार्गदर्शन करताय. सत्तार भाऊ माझेच भाऊ आहेत, भुमरे भाऊ पण माझेच भाऊ आहेत. ती बाई म्हणते सगळेच माझे भाऊ आहेत. मात्र तिने काय-काय लफडी केली आहे, हे तिलाच माहित. अरे पण तू आहे तरी कोण? असे संजय शिरसाट यांनी म्हंटले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Pigeon Feeding : नियंत्रित पद्धतीने कबुतरांना खाद्य देण्यासाठी तीन संस्थांनाचे अर्ज

Latest Marathi News Update live : गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेवर 2 विशेष गाड्या धावणार; प्रवाशांची प्रचंड गर्दी लक्षात घेता रेल्वे प्रशासनाचा निर्णय

Accident : मुंबईच्या शिवडी येथे शाळेच्या बसचा अपघात; 4 मुलं जखमी

GST मध्ये मोठे बदल ; आता 5 टक्के आणि 18 टक्के असे दोन टप्पे