राजकारण

Uday Samant : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपाबाबत उदय सामंत म्हणाले...

उदय सामंत यांनी जागावाटपाबाबत मोठं विधान केलेलं आहे.

Published by : Siddhi Naringrekar

उदय सामंत यांनी जागावाटपाबाबत मोठं विधान केलेलं आहे. उदय सामंत माध्यमांशी बोलताना म्हणाले की, महाराष्ट्राचे तीन महायुतीचे जे नेते आहेत. त्यामध्ये एकनाथजी शिंदे आहेत, देवेंद्रजी आहेत आणि अजितदादा आहेत. मला असं वाटते त्यांच्या समन्वयाने प्रत्येक पक्षाच्या यात्रा सुरु झालेल्या आहेत.

20 तारखेपासून आमची महायुतीची देखील फार मोठी यात्रा कोल्हापूरमधून सुरुवात होणार आहे. तिकीट जाहीर झालेलं आहे. त्याच्याबद्दल नेतेमंडळींची चर्चा झालेली असेल. पण हे सगळं करत असताना तिकीट वाटपाची चर्चा मात्र सुरु झालेली आहे हे नक्की आहे.

यासोबतच ते म्हणाले की, तीन दिवसांपूर्वी रात्री हे तिन्ही नेते वर्षा बंगल्यावर या संदर्भामध्ये चर्चेसाठी बसलेलं होते आणि मला असं वाटतं की, निवडणुकीच्या तोंडाला तुम्हाला कुठलीही ब्रेकिंग न्यूज मिळणार नाही याची दक्षता तिन्ही नेते योग्य पद्धतीने घेतील. असे उदय सामंत म्हणाले.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : पत्राचाळीच्या रहिवाशांची म्हाडा कार्यालयावर निदर्शनं

Pune Rain : पुण्यात पावसाचा जोर वाढला; सखल भागात पाणी साचले, वाहतुकीचा खोळंबा

Mumbai : मुंबई विमानतळावर ओरिओ बिस्कीट आणि चॉकलेटमधून कोकेनची तस्करी

Chhatrapati Sambhajinagar : बालगृहातील प्रकारानंतर राज्यभरातील बालगृहांबाबत महत्त्वपूर्ण बैठक; सुरक्षेच्या उपाययोजनांवर भर