राजकारण

shivsena crisis : शिवसेनेनंतर आता युवा सेनेलाही झटका ; 200 युवा सैनिक शिंदे गटात सहभागी

जळगावमध्ये शिवसेनेनंतर युवा सेनेलाही मोठा फटका बसला असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात प्रथमच युवासेनात फूट पडली असून युवा सेनेचे 80 पदाधिकारी आणि 200 युवा सैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मंगेश जोशी | जळगाव : शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेनेत मोठी बंडखोरी केल्यापासून शिवसेनेत आमदारांची आणि नेतेमंडळींची गळतीच लागल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता जळगावमध्ये शिवसेनेनंतर युवा सेनेलाही मोठा फटका बसला असल्याची माहिती मिळत आहे. महाराष्ट्रात प्रथमच युवासेनात फूट पडली असून युवा सेनेचे 80 पदाधिकारी आणि 200 युवा सैनिक शिंदे गटात सहभागी झाले आहे. त्याचबरोबर आमदार गुलाबराव पाटील यांच्या उपस्थितीत अजिंठा विश्रामगृहावर युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. एकीकडे युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांची राज्यभरात निष्ठा यात्रा सुरू असताना दुसरीकडे मात्र जळगाव युवा सेनेला मोठा धक्का बसला आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेतील 50 आमदारांना सोबत घेत वेगळी राजकीय वाट निवडली. भाजप आणि शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमदारांनी राज्यात सत्ता स्थापन केली असून, आता एकनाथ शिंदे यांना विविध भागातील पदाधिकाऱ्यांकडून पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्यांना मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढत चालला आहे.

याआधी ठाणे त्यानंतर कल्याण डोंबिवली, अंबरनाथ-बदलापूर, उल्हासनगर, नवी मुंबई येथील शिवसेनेच्या अनेक माजी नगरसेवकांनी एकनाथ शिंदे यांना आपला पाठींबा जाहीर केलेला आहे. तर भिवंडी, मुरबाड, शहापूर, वसई विरार, पालघर या पट्ट्यातील अनेक माजी नगरसेवक, जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य हेदेखील शिंदे यांच्या गटात सामील झाले आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी