महाराष्ट्र

चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ; शालेय पोषण आहारात आढळल्या चक्क अळ्या-सोंडे

Published by : Shweta Shigvan-Kavankar

उदय चक्रधर | गोंदिया : चिमुकल्या विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ करण्याचा धक्कादायक प्रकार गोंदिया जिल्ह्यातील आमगाव पंचायत समिती अंतर्गतील अंजोरा येथील वरिष्ठ प्राथमिक शाळेत घडला आहे. विद्यार्थ्यांच्या पोषण आहारात चक्क अळ्या व सोंडे आढळल्याने मोठी खळबळ उडाली. ही बाब लक्षात येताच विद्यार्थ्यांनी अन्न बाहेर टाकले. अन्यथा, या अन्नामुळे विद्यार्थ्यांची प्रकृती बिघडली असती व त्यांचा जीव धोक्यात आला असता. या घटनेवर पालक वर्गाने शाळेवर मोर्चा काढत तीव्र संताप व्यक्त केला आहे.

राज्यात प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य सुदृढ राहावे, यासाठी शासनाने मध्यान्ह भोजन देणे सुरू केले आहे. पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार पुरविण्याची शासनाची योजना आहे. हा पोषण आहार शाळांमध्येच शिजविला जात असून शाळेतील शिक्षकांच्या देखरेखीखाली काही महिला अन्न शिजवतात. मात्र, अंजोर येथील शाळेत मधल्या सुटीत विद्यार्थ्यांना भोजन वाटप केले असता विद्यार्थ्यांना शिजवलेल्या आहारात चक्क अळ्या व सोंडे असलेले अन्न दिले.

विद्यार्थ्यांच्या हे लक्षात येताच संपूर्ण अन्न टाकून दिले. याची माहिती विद्यार्थ्यांच्या पालकांना समजताच तीव्र संताप व्यक्त केला असून शाळेवर मोर्चा काढला होता. यामुळे काही काळ परिसरात तणावचे वातावरण होते.

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ

Wedding Rituals: हिंदू धर्मात लग्नाच्या वेळेस का केली जाते सप्तपदी? जाणून घ्या कारण...

Wedding Rituals: लग्नात का चोरतात नवरदेवाचे बूट? रंजक आहे यामागचं कारण

"त्या पदावरून शरद पवार बाजूला गेले आणि..." बारामतीच्या सभेत अजित पवारांनी सांगितला मोठा किस्सा