Pratap Sarnaik 
महाराष्ट्र

Pratap Sarnaik: 29 महापालिकांवर महायुतीचाच महापौर येणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी व्यक्त केला विश्वास

Maharashra Politics: महापालिका निवडणुकांमध्ये शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचाच महापौर निवडून येईल, असा विश्वास परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला आहे.

Published by : Dhanshree Shintre

महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची (भाजप) युती अधिक मजबूत होत आहे. २९ महानगरपालिकांमध्ये शिवसेना-भाजप-राष्ट्रवादी महायुतीचा महापौर निवडून येणार असल्याचे ठरले आहे. ठाणे जिल्ह्यातील जागा वाटपाबाबतही अंतिम निर्णय झाला असून, स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी भाजपाचे ठाणे जिल्हाध्यक्ष निरंजन डावखरे आणि संदीप लेले यांच्याशी चर्चा केली आहे. मुंबईत उद्या रंगशारदा येथे होणाऱ्या बैठकीतही महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहेत.

युतीतर महाराष्ट्रातील २९ महापालिकांमध्ये करण्याचा निर्णय आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस आणि आमच्या पक्षाचे नेते उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांनी घेतलेला आहे. राज्यातील महापालिकांमध्ये युतीतूनच लढायचा निर्णय झालेला आहे. काही ठिकाणी अपवादास्पद परिस्थिती येऊ शकते परंतू ठाणे जिल्ह्यांमध्ये बहुतांश महापालिकांमध्ये युती करण्याचा निर्णय हा एकनाथ साहेबांनी आणि देवेंद्रजींनी घेतलेला आहे. ठाणे महापालिका क्षेत्रांमध्ये पदाधिकाऱ्यांची बैठक सुद्धा होणार. त्या बैठकीत आमचे खासदार नरेश म्हस्केच्या माध्यमातून भारतीय जनताच्या सर्व नेत्यांबरोबर ते चर्चाही करतील आणि आम्हाला खात्री आहे सर्व महापालिकेवर शिवसेना,भाजप,राष्ट्रवादी महायुतीचाच महापौर होणार असे प्रताप सरनाईक म्हणाले.

शिवसेनेचे नेते सलमान जनक यांनी सांगितले की, एकत्रितपणे लढण्याच्या सर्व जागांबाबत निर्णय झाला आहे. ही नैसर्गिक युती असून, दोन्ही पक्षांसाठी तितकीच महत्त्वाची आहे. ऑपरेशन लोटस आणि ऑपरेशन टायगरचे राजकीय खेळ आता संपले आहेत. भाजप आणि शिवसेना हे जुळे भाऊ आहेत. मुंबईत महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) जास्त जागा मागत असल्याने युतीची घोषणा रखडली आहे, पण सगळीकडे एकत्र लढण्याचा निर्णय दोन्ही पक्षांनी घेतला आहे. ठाण्यात शिवसेनेचा भगवा कायम राहील आणि मोठ्या संख्येने नगरसेवक निवडून येतील.

मुंबईतील जागा वाटपाबाबत अफवा पसरवल्या जात आहेत, पण चार भिंतींमधील चर्चा सुरू आहेत. चांगल्या वातावरणात महापालिका निवडणुका लढवू, असेही सलमान जनक म्हणाले. ही युती शिवसेनेसाठी जेवढी महत्त्वाची आहे, तेवढीच भाजपसाठीही आहे. बैठकीचे सत्र सुरू राहणार असून, युतीच्या उमेदवारांना विजयी करण्यासाठी जोरदार तयारी सुरू आहे. ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे वर्चस्व कायम राहील, असा विश्वास युतीने व्यक्त केला आहे. या युतीमुळे महायुतीला मोठा फायदा होईल आणि विरोधकांना धक्का बसेल. निवडणुकांसाठी उमेदवारांची यादी लवकर जाहीर होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा