राज्यात पुढील 3 ते 4 दिवस जोरदार पावसाचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. उत्तर महाराष्ट्रातील जळगाव, धुळे, नाशिक, सोलापूर जिल्ह्यात पावसाचा अंदाज आहे तसेच बीड, परभणी, लातूर, नांदेड, धाराशिव, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा, नागपूर, भंडारा, गोंदियामध्ये जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.