Maharashtra Weather Update) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.
राज्यात मे महिन्यात सुरू असलेला पावसाचा जोर जूनच्या सुरुवातीपासूनच ओसरला असल्याचे पाहायला मिळत आहे. राज्यात ढगाळ हवामानासह हलक्या ते मध्यम सरी पडत असल्या तरी मात्र उकाड्याने माणसे हैराण झाली आहेत.
पुढील दोन ते तीन दिवस राज्यात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आवाहन करण्यात आलं आहे.