Maharashtra Weather Update  
महाराष्ट्र

Maharashtra Weather Update : राज्यातील 'या' भागात अतिमुसळधार पावसाचा इशारा

राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे.

Published by : Siddhi Naringrekar

(Maharashtra Weather Update) राज्यात ठिकठिकाणी पावसानं जोरदार हजेरी लावली आहे. आज राज्यात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. विविध भागांत मुसळधार पाऊस झाल्याने शेतीचे नुकसान झाले आहे. हवामान विभागाने पुढील 5 दिवस राज्यातील काही भागात जोरदार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

पश्चिम किनारपट्टीवर असलेल्या महाराष्ट्रासह चार राज्यांना हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच पुढील 6-7 दिवसांत महाराष्ट्रासह चार राज्यांत अतिवृष्टी सदृश्य ते अतिमुसळधार पाऊस होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, मुंबईसह ठाणे जिल्ह्यांना आज यलो अलर्ट देण्यात आला आहे. आज कोकणाला ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. आजही काही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे व स्थानिक शासकीय यंत्रणेकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे. असे प्रशासनाकडून आवाहन करण्यात आले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : भारत-पाकिस्तान सामन्यात पाकिस्ताने टॉस जिंकून फलंदाजी निवडली

Jaipur Accident : जयपूरमध्ये भीषण अपघातात संपुर्ण कुटुंब उध्वस्त! हरिद्वारहून अस्थी विसर्जन करून परतत असताना...

Assam Earthquake : रशियानंतर आता आसाममध्ये भूकंपाचे तीव्र धक्के, लोकांमध्ये भीतीचे वातावरण

A. T. Patil Jalgaon : 'माझ्याशी दुश्मनी घेऊ नको, तुला...', माजी खासदार ए.टी. पाटलांची कोणाला धमकी?