महाराष्ट्र

Sandeep Naik | "वाढदिवसाला हार तुरे नको फक्त वृक्ष रोपणसाठी एक झाड द्या"

भाजपचे माजी आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला.

Published by : Team Lokshahi

हर्षल भदाणे पाटील | नवी मुंबई : भाजपचे माजी आमदार संदीप नाईक (Sandeep Naik) यांचा वाढदिवस अत्यंत साध्या पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी कोणतेही हार तुरे न स्वीकारता केवळ वृक्षरोपणासाठी वृक्ष स्वीकारण्यात आले. यासोबतच वाढदिवसानिमित्त भारताच्या अमृत महोत्सव अंतर्गत हर घर तिरंगा अभियानाला हातभार लावत शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या प्रत्येक नागरिकाला तिरंगा झेंडा भेट देत हा वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी शुभेच्छा देणाऱ्यांची मोठी गर्दी झाली होती. त्यांनी सर्वांना स्वातंत्र्यदिनानिमित्त तिरंगा फडकवण्याचे आवाहन केले. नवी मुंबईतील इतर पक्षातील अनेक नेत्यानी आपली हजेरी लावत माजी आमदार संदीप नाईक यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

आपल्या देशाप्रती आपण काहीतरी देणं लागतो, ही भावना प्रत्येकाने मनात ठेवली पाहिजे. आपल्या देशाचा अभिमान असलेला राष्ट्रध्वज प्रत्येकाने घरोघरी फडकवला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 'हर घर तिरंगा' या मोहिमेस प्रत्येक नागरिकाने प्रतिसाद दिला पाहिजे, असे मत माजी आमदार संदीप नाईक यांनी आपल्या वाढदिवसा निमित्त आभार प्रकट करताना व्यक्त केले. तर नाईक यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी शहरभर रक्तदान शिबीर, आरोग्य शिबीर, वृक्षारोपण, फळ वाटप असे समाजोपयोगी कार्यक्रम राबवले.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा