महाराष्ट्र

Santosh Bangar : बंडखोर आमदार संतोष बांगर यांना झटका! शिवसेनेची मोठी कारवाई

हिंगोलीतील शिवसेना बंडखोर (Shivsena Rebel MLA) आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला असुन बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

हिंगोलीतील शिवसेना बंडखोर (Shivsena Rebel MLA) आमदार संतोष बांगर यांना शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी मोठा धक्का दिला असुन बांगर यांना शिवसेना हिंगोली जिल्हा शिवसेना प्रमुख पदावरुन हटवण्यात आलं आहे. शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू आणि एकनिष्ठ म्हणून ओळखले जाणारे आमदार संतोष बांगर (MLA Santosh Bangar) यांनी एकनाथ शिंदे गटात सामील होत पक्षाशी बंडखोरी केली होती. त्यानंतर त्यांना जिल्हाप्रमुख पदावरून हटविण्याची मागणी संपर्कप्रमुख आनंदराव जाधव यांच्याकडे पक्षातील जिल्ह्यातील शिवसैनिकांनी केली होती.

बांगर हे पक्षातून बंडखोरी करून शिंदे गटात सहभागी झाल्यानंतर हिंगोली जिल्हा भरात शिवसैनिकांकडून नाराजी व्यक्त केली जाऊ लागली होती. संतोष बांगर हे कळमनुरी विधानसभेचे आमदार त्याचबरोबर जिल्ह्याचे शिवसेनेचे जिल्हाध्यक्ष सुद्धा होते. आता त्यांना जिल्हा प्रमुख पदावरुन हटवण्यात आले आहे. शिवसेनेकडून हा मोठा धक्का बांगर यांना दिला गेला आहे.

२००९ पासून आमदार संतोष बांगर हे हिंगोलीचे शिवसेनेचे जिल्हा प्रमुख होते. आता त्यांना या पदावरुन हटवण्यात आले आहे. बांगर यांना जिल्हाध्यक्ष पदावरून हटवल्यानंतर आता नवीन जिल्हा प्रमुख निवडण्यासाठी पक्षश्रेष्ठी जिल्ह्यातील शिवसैनिकांची चाचपणी करीत आहे.

दरम्यान बहुमत चाचणीच्या आदल्या दिवशीपर्यंत ठाकरें सोबत असलेले कळमनुरीचे आमदार संतोष बांगर बहुमत चाचणीच्या दिवशी बंडखोरांच्या बसमध्ये दिसले. त्यांनी विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विरोधात मतदान केलं होत. ज्यावेळी एकनाथ शिंदेंनी बंड केला आणि त्यांच्यासोबत शिवसेनेचे इतरही आमदार निघून गेले, त्यावेळी संतोष बांगर ढसाढसा रडले होते. मी बाळासाहेबांचा खरा शिवसैनिक म्हणत ते उद्धव ठाकरे यांच्यासाठी रडलेही होते. त्या नंतर बांगर अवघ्या काही तासांत हे शिंदे गटात सहभागी झाले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश

Mahesh Manjrekar : 'हे केवळ माझ्या मुलाखतीमुळे घडलं नाही..., ते एकत्र आले तर आनंदच'; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा