महाराष्ट्र

Mumbai Local Trains: सर्वसामान्य नागरिकांसाठी आजपासून मुंबई लोकल सेवा सुरु; कोणत्या वेळेत करता येणार प्रवास? पाहा संपूर्ण वेळापत्रक

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यावश्यक सेवेत काम करणाऱ्यांसोबत इतर काही लोकांना मुंबई लोकलमधून (Mumbai Local Trains) प्रवास करण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र, गेल्या अनेक महिन्यांपासून सर्व सामान्यांना लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी नव्हती. अखेर मुंबईची लाइफलाईन असलेली लोकल सेवा आजपासून (1 फेब्रुवारी) सर्वांसाठी सुरु होत आहे. याबाबत राज्य सरकारने शुक्रवारी घोषणा केली होती. दरम्यान, गर्दी होणार नाही अशा वेळा आखून सर्व सामान्यांना मुंबई लोकलमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यामुळे कोणत्या वेळेत सर्व सामान्यांना प्रवास करता येणार? यासाठी खालील माहिती अधिक फायदेशीर ठरणार आहे.

दरम्यान, सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी 7 वाजेपर्यंत, त्यानंतर दुपारी 12 पासून दुपारी 4 पर्यंत आणि रात्री 9 पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येणार आहे. महत्वाचे म्हणजे, सकाळी 7 ते दुपारी 12 आणि दुपारी 4 ते रात्री 9 या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवेने प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवाशांनाच प्रवास करण्याची परवानगी मिळाली आहे. राज्य सरकारने घेतलेल्या या निर्णयामुळे सर्व सामन्य नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या कामांना यश मिळण्याची शक्यता , कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा