महाराष्ट्र

मनपा प्रशासन देणार पालिका शाळेतील विद्यार्थ्यांना मोबाईल टॅब

Published by : Lokshahi News

कोरोना आजाराचा  प्रादुर्भाव वाढत असल्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून शाळा बंद ठेवण्यात आल्या आहेत. तसेच करोनाच्या  संभाव्य तिसऱ्या लाटेचा फटका लहान मुलांना अधिक बसणार असल्याचे स्पष्ट करण्यात आल्यामुळे लसीकरण पुर्ण होई पर्यंत शाळा सुरु करण्यात येणार नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. मात्र यामुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर गंभीर परिणाम होत असल्याची तक्रार सातत्याने करण्यात येत आहे. त्यात मिरा भाईंदर शहरातील गरजू विद्यार्थांच्या शिक्षणाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

मिरा भाईंदर शहरात महानगरपालिकेच्या एकूण ३५ शाळा असून त्यात मराठी, हिंदी, गुजराती आणि उर्दू माध्यमाचे विध्यार्थी शिक्षण घेत आहे. पहिली ते आठवी पर्यंतच्या विध्यार्थाची संख्या ६ हजार १७० इतकी आहे. यात पालिकेने केलेल्या सर्वेक्षणानुसार मोबाईल फोन नसलेल्यांची संख्या ७०० आहे तर १९६७ विधार्थांकडे साधे फोन आहेत. तसेच दूरदर्शन द्वारे शिक्षण उपलब्ध केवळ २५०५ विध्यार्थांपर्यंतच पोहचू शकत आहे. आणि २१६६ विध्यार्थांकडे अँड्रॉइड फोन असल्यामुळे त्यांना झूम आणि व्हाट्सअँपद्वारे शिक्षण उपलब्ध करून दिले जात आहे.

मात्र यामुळे अनेक विध्यार्थ्यांच्या शिक्षणात अडचणी येत असून शिक्षणाकडे दुर्लक्ष होत असताना पाहायला मिळत आहे. मिरा भाईंदर शहरातील विद्यार्थांना तात्काळ टॅब उपलब्ध करून देण्याची मागणी भाजप नगरसेवक ध्रुवकिशोर पाटील यांनी प्रशासनाजवळ केली. याकरिता महासभेत ठराव मांडण्यात आला असून टॅब विकत घेण्याकरिता प्रशासनाच्या हालचाली सुरु असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. इयत्ता पाचवी ते आठवी पर्यंत असलेल्या विद्यार्थ्यांना टॅब देण्यात येणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Rupali Chakankar On Pranjal Khevalkar : प्रांजल खेवलकरांच्या मोबाईलमध्ये महिलांचे नग्न फोटो? रुपाली चाकणकरांची खळबळजनक माहिती

Ladki Bahin Yojana : अखेर 12 व्या हफ्त्याची तारीख जाहीर! कधी आणि किती रक्कम खात्यात जमा होणार? आदिती तटकरेंचा मोठा खुलासा

Rakshabandhan 2025 : यंदा राखी बांधण्यासाठी सर्वोत्तम वेळ कोणता? जाणून घ्या शुभ मुहूर्त, योग्य दिशा आणि विशेष योग

PM Modi On Donald Trump : ट्रम्प यांच्या 'त्या' निर्णयावर मोदीचं ठाम प्रत्युत्तर; "प्रत्येक किंमत मोजायला..."