थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
राज्यातील 226 नगरपालिका आणि 38 नगर पंचायतींच्या निवडणुका टप्पा पार पडल्यानंतर आता महापालिका निवडणुकीचे काऊंटडाऊन सुरू झाला आहे. राज्य निवडणूक आयोगाने मुंबईसह 29 महापालिका आयुक्तांची बैठक उद्या गुरुवारी बोलवली असून या बैठकीत प्रारूप मतदार याद्या आणि निवडणूक तयारीबाबत सविस्तर माहिती घेतली जाणार आहे. महापालिका आयुक्तांची निवडणूक सज्जता लक्षात घेऊन आयोग सार्वत्रिक निवडणुकीचा कार्यक्रम तयार करू इच्छित आहे.
राज्य निवडणूक आयोगाने महापालिका निवडणुकीसाठी मतदार याद्यांच्या संदर्भात सुधारित कार्यक्रम आधीच जाहीर केला होता. त्यानुसार प्रारूप मतदार यादीवर हरकती आणि सूचना देण्याची मुदत आज, बुधवारी संपली. या यादीवर आलेल्या हरकतीवर निर्णय घेऊन प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून 10 डिसेंबर 2025 रोजी प्रसिद्ध करण्याचे ठरले आहे. त्यानंतर 22 डिसेंबर 2025 रोजी मतदान केंद्रनिहाय मतदार यादीही प्रसिद्ध केली जाणार आहे.
सुधारित कार्यक्रमानुसार महापालिकांनी निवडणूक तयारी कितपत पूर्ण केली आहे, याबाबतची माहिती आजच्या बैठकीत घेण्यात येईल. तसेच, मतदार यादी दुरुस्त करण्यासाठी महापालिकांनी वेळ वाढवण्याची मागणी केल्यास निवडणूक आयोग त्यासाठी आणखी दोन ते तीन दिवसांचा कालावधी देण्यास तयार असल्याचेही आयोगाने सांगितले आहे. यामुळे महापालिका आयुक्तांकडून मिळणाऱ्या माहितीच्या आधारे निवडणुकीच्या तारखा आणि कार्यक्रम निश्चित करण्यात येणार असल्याचे निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
कोणत्या महानगरपालिकेच्या निवडणुका होणार? संपूर्ण यादी
मुंबई
नवी मुंबई
कल्याण डोंबिवली
ठाणे, पनवेल
उल्हासनगर
भिवंडी निजामपूर
मिरा भाईंदर
पिंपरी चिंचवड
वसई विरार
पुणे
सोलापूर
कोल्हापूर
अमरावती
चंद्रपूर
नाशिक
नागपूर
संभाजीनगर
मालेगाव
नांदेड
लातूर
अकोला
परभणी
धुळे
जळगाव
इचलकरंजी
अहिल्यानगर
सांगली-मिरज
जालना
राज्यातील २९ महापालिकांच्या निवडणुका लवकरच जाहीर होण्याची चिन्हे.
आयोगाने महापालिका आयुक्तांसोबत बैठक घेऊन तयारीचा आढावा घेण्याचे ठरवले.
१० डिसेंबर २०२५ रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होणार.
महापालिकांच्या मागणीनुसार मतदार यादी दुरुस्तीला अतिरिक्त वेळ मिळू शकतो.
निवडणुकीची तारीख आणि कार्यक्रम आयोगाकडून लवकरच निश्चित होण्याची शक्यता.