नाशिकच्या राजकारणात मोठी उलाढाल होण्याची शक्यता आहे. नाशिकचे भाजपचे माजी उपमहापौर शिवसेनेच्या वाटेवर असल्याचे वृत्त समोर आहे. नाशिक महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत.नाशिक महापालिका निवडणुकीच्यापार्श्वभूमीवर नाशिकमध्ये सर्वच पक्ष मोर्चेबांधणी करत आहेत. या दरम्यान अशी माहिती समोर आली आहे की नाशिकचे भाजपचे माजी उपमहापौर प्रथमेश गीते शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे.
सध्या शिवसेना खासदार संजय राऊतही नाशिक दौऱ्यावर आहेत. या दरम्यान प्रथमेश गीते यांनी संजय राऊत यांची भेट घेतल्याची माहिती मिळते आहे. भाजपमध्ये गळचेपी होत असून बोलू दिल जात नसल्याचा आरोप केला जात आहे, परिणामी गीते शिवसेनेच्या वाटेवर आहेत. दरम्यान अद्याप पक्षप्रवेशाची तारीख निश्चित नाही आहे. प्रथमेश गीते हे माजी आमदार वसंत गीते यांचे सुपूत्र आहेत. त्यांच्या शिवसेना प्रवेशाची तारीख ठरली नसली तरी भाजमध्ये ते नाराज आहेत हे निश्चत आहे.