Navneet Rana and Ravi Rana team lokshahi
महाराष्ट्र

15 दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा अन्यथा...,राणा दाम्पत्याला पालिकेचा इशारा

राणा दाम्पत्याने नोटिशीला दिलेलं उत्तर अमान्य; घरावर चालणार BMCचा हातोडा

Published by : Shweta Chavan-Zagade

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) आणि आमदार रवी राणा (Ravi Rana) च्या अडचणींमध्ये वाढ झाली असून यांचे मुंबईतील खार येथील असलेल्या निवासस्थानाचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत महापालिकेने नोटीस दिली आहे. पुढील सात ते १५ दिवसांमध्ये अनधिकृत बांधकाम हटवा, अन्यथा आम्हाला याबाबत कारवाई करावी लागेल, असा इशाराही महापालिकेकडून देण्यात आल्याची माहिती आहे.

राण दाम्पत्याला 7 दिवसांची कारणा दाखवा नोटी

नवनीत राणा आणि रवी राणा यांचे मुंबईतील खार येथे घर असून ज्या इमारतीत हे घर आहे त्या इमारतीबाबत अनेक तक्रारी पालिकेकडे आल्या होत्या. त्यानंतर राण दाम्पत्याला 7 दिवसांची कारणा दाखवा नोटीस पाठवण्यात आली होती. या नोटीसीची मुदत संपली असून महापालिकेने पुन्हा एकदा राणा दाम्पत्याला इशारा केला आहे. कारणे दाखवा नोटीसीला राणा दाम्पत्यांनी उत्तरे दिली होती. ती उत्तरे पालिकेने अमान्य करत इशारा केला आहे. दरम्यान महापालिका बांधकाम अनाधिकृत असल्याच्या मुद्द्यावर ठाम आहे.

तसेच इमारतीतील अनेक सदनिकांमध्ये मंजूर आराखड्याव्यतिरिक्त अधिकचे बांधकाम करून पालिकेच्या नियमांचे उल्लंघन करण्यात आलं आहे, अशा तक्रारी प्राप्त झाल्याने मुंबई महापालिकेने तपासणीसाठी कलम ४८८ नुसार अनेक सदनिकाधारकांना नोटीस पाठवल्या आणि त्यानंतर मुंबई महापालिकेच्या पथकाने याबाबत तपासणी केली.

नेमंक प्रकरण काय?

राणा दाम्पत्यांनी उद्धव ठाकरे यांच्या मातोश्री या खासगी निवासस्थानाबाहेर हनुमान चालीसा पठणाचा इशारा दिला होता. त्यानंतर त्यांना शिवसैनिकांकडून विरोध करण्यात आला होता. राणा दाम्पत्यांवर वाद पेटवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पालिकेने त्यांच्या राहत्या घराचे बांधकाम अनाधिकृत असल्याचं सांगत नोटीस पाठवली होती. त्या नोटीसीची मुदत संपल्यावर पुन्हा महापालिकेने इशारा केला आहे. पुढील १५ दिवसांच्या आत राणा दांपत्यानं बांधकाम पाडावे नाहीतर कारवाई करण्याचा पालिकेने इशारा केला आहे. दरम्यान याप्रकरणी राणा दाम्पत्य कोर्टात जाऊ शकते किंवा पालिकेच्या इमारत प्रस्ताव विभागाकडे नियमिततेचा अर्ज करू शकते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा