महाराष्ट्र

नवाब मलिकांकडून सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न – आशिष शेलार

Published by : Lokshahi News

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanvis )यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेत जे फटाके फोडले त्यानंतर मंत्री नवाब मलिक (Nawab malik ) यांना ते फटाके भिजलेले वाटले पण त्यांचा चेहरा मात्र घामाने भिजलेला होता. चेहऱ्यावरचा थाट, रुर, मेक उतरलेला होता. त्यांनी देवेंद्र फडणवीस यांनी केलेल्या सर्व आरोपांची कबुलीच मलीक यांनी पत्रकार परिषदेत दिली, असा प्रतिहल्ला भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार (Ashish Shela)यांनी चढवला.

आमदार अँड आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, दोन वर्ष तुमच्याकडे सरकार आहे, तुमच्या पक्षाकडं गृहमंत्रिपद आहे. हाजी अराफत किंवा हाजी हैदर यांच्यावर एनसीसुद्धा नोंद करु शकला नाहीत. गुन्हेगारांना राजाश्रय हा धंदा तुमचा आहे, असं आशिष शेलार म्हणाले. नवाब मलिक यांच्या आरोपाप्रमाणं बनावट नोटा प्रकरणातील आलम शेख हा काँग्रेसचा सचिव होता. तो सध्या राष्ट्रवादी काँग्रेसचा कार्यकर्ता आहे. हाजी हैदर स्वत: पत्रकार परिषद घेणार आहेत. गेल्या दोन वर्षात बांगलादेश सोडा मंबईत कुठंही गुन्हा केल्याचं प्रकरण नाही. सामान्य माणसाला लटकवण्याचा प्रयत्न नवाब मलिक यांनी केला.

"हे मोदी सरकार नव्हे, हे तर गजनी सरकार"; उद्धव ठाकरेंनी विरोधकांवर डागली 'मशाल'

"कुणी भारताला थप्पड मारली, तर त्याचा जबडा तोडण्याची हिंम्मत आजच्या भारताकडे आहे", सोलापूरात योगी आदित्यनाथ कडाडले

"देशातील वाढत्या महागाईला नरेंद्र मोदीच जबाबदार", मविआच्या सभेत शरद पवारांचा महायुतीवर घणाघात

"नरेंद्र मोदींचं काम पाहून राज ठाकरेंनी..."; शिवतीर्थावर ठाकरेंची भेट घेतल्यानंतर श्रीकांत शिंदेंनी स्पष्टच सांगितलं

"...तर सर्वसाधारण कार्यकर्तासुद्धा खासदार बनू शकतो"; राज ठाकरेंच्या भेटीनंतर नरेश म्हस्केंचं मोठं विधान