महाराष्ट्र

विनायक मेटे मृत्यू प्रकरणाला नवे वळण; कारचालकावर गुन्हा दाखल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांचे आज अपघातात निधन झाले. या प्रकरणाला आता नवे वळण लागले आहे. कार चालक एकनाथ कदम यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राज्य सीआयडीने कलम 304 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

विनायक मेटे अपघात प्रकरणी सीआयडीने सखोल चौकशी करत होती. यानुसार विनायक मेटे यांची कार ज्या महामार्गावरुन गेली तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं फूटेज सीआयडीने तपालसे. याशिवाय तज्ज्ञांची एक समिती तयार करून त्यांच्याकडूनही मते घेण्यात आली. या समितीत आयआरबीचे अभियंता आणि इतरांचा समावेश होता. सीआयडीने पाहिलेल्या सीसटीव्ही फूटेजमध्ये कार चालक ताशी 120 ते 140 किमी वेगाने गाडी चालवत असल्याचं दिसत होतं.

तसेच, अपघात होण्याआधी चालक एकनाथ कदमने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला होता. आपल्याला ओव्हरटेक करता येणार नाही हे माहित असूनही त्याने ओव्हरटेक केला आणि त्याचा परिणाम म्हणून भीषण अपघात घडला. सीआयडीच्या तपासात या बाबीसमोर आल्यानंतर त्यांनी रसायनी पोलिसांमध्ये विनायक मेटे यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला असून लवकरच चालकाला ताब्यात घेण्यात येणार आहे.

दरम्यान, विनायक मेटे यांच्या गाडीला 14 ऑगस्ट रोजी पहाटे पाच वाजता मुंबई-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. त्यांना नवी मुंबईतील एमजीएम रुग्णालयात दाखल केले. परंतु, डॉक्टरांनी विनायक मेटे यांना मृत घोषित केले होते. विनायक मेटे यांच्या निधनानंतर राज्यभरातून त्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

"माझ्या पाठीत नाही, मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेच्या पाठीत वार केला"; उद्धव ठाकरेंची PM मोदींवर घणाघाती टीका

महाविकास आघाडीला छत्रपती शिवाजी महाराज आणि संभाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही - एकनाथ शिंदे

Alia Bhatt MET GALA Look 2024: 'मेट गाला २०२४'मध्ये आलियाने केला 'हा' खास लूक, पाहा फोटो...

Daily Horoscope 09 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांच्या जीवनात घडणार महत्त्वाचे बदल; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 09 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना