Nilesh Rane Team Lokshahi
महाराष्ट्र

Nilesh Rane : आज पेंग्विनचा वाढदिवस तर उद्या सुशांतचा मृत्यूदिन

निलेश राणे यांचा सुशांत सिंह राजपूतवरुन आदित्य ठाकरेंवर निशाणा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : पर्यावरणमंत्री आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांचा आज वाढदिवस आहे. यानिमित्त शिवसेनेतर्फे (Shivsena) राज्यभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. परंतु, याच वाढदिवसाचे औचित्य साधून भाजप नेते निलेश राणे (Nilesh Rane) यांनी आदित्य ठाकरेंवर निशाणा साधला आहे.

निलेश राणे म्हणाले, आज १३ जून पेंग्विनचा वाढदिवस. १४ जून २०२० सुशांत सिंग राजपूत याचा मृत्यू. १३ जून २०२० रात्री १ पार्टी झाली ज्या पार्टीमध्ये बरच काही घडलं/बिघडलं, ७० दिवसांच्या सारवासारव नंतर सीबीआयला एंट्री मिळाली तोपर्यंत सगळे पुरावे नष्ट करण्यात आले होते. एक ना एक दिवस सत्य बाहेर येणार, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, 14 जून रोजी अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा मृतदेह त्याच्या राहत्या घरात गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता. तर त्याआधी सुशांतची मॅनेजर दिशा सालियन हिनेही आत्महत्या केली होती. या दोन्हींवरून ही आत्महत्या नसून, हत्या असल्याचा आरोप विरोधी पक्षांकडून करण्यात आला होता. यावरुन राज्यात भाजप-शिवसेना संघर्ष चांगलाच पेटला असल्याचे दिसून आले होते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Police Bharti : महाराष्ट्र पोलीस भरतीला गती, 15, 631पदांसाठी शासन निर्णय जारी

Gold Rate Today : सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण; खरेदीदारांसाठी सुवर्णसंधी

Thane water Cut : ठाणेकरांनो पाणी जपून वापरा! पुढील काही दिवस 25 टक्के पाणी कपात

Jalgaon Accident : आयशर वाहनाची एसटी बसला जोरदार धडक; बसचे मोठे नुकसान, 1 जणाचा मृत्यू, 25 प्रवासी जखमी