महाराष्ट्र

नितेश राणे यांच्या गाडीला अपघात; ट्रकने मागून दिली धडक

Published by : Shweta Shigvan-Kavankar

चंद्रशेखर भांगे | पुणे : पुणे-मुंबई महामार्गावर अपघातांची मालिका सुरुच असून आज भाजप नेते नितेश राणे यांच्या गाडीला अपघात झाला आहे. महामार्गावरील उर्से टोलनाका येथे ही घटना घडली आहे. सुदैवाने यामध्ये कोणालाही जखमी झाले नाही.

नितेश राणे यांची पत्नी मुलं आणि नातेवाईक गाडीतून प्रवास करत होते. पुण्याहून मुंबईला जाताना उर्से टोल नाक्यावर टोल भरण्यासाठी रांगेत थांबली होती. यावेळी ट्रकने गाडीला मागून धडक दिली. या अपघातात कुणीही जखमी झाले नाही.

दरम्यान, या घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी संबंधित ट्रक चालकाला ताब्यात घेतले असून अपघाताचे नेमके कारण अद्याप समजू शकले नाही. ट्रकचा ब्रेक दाबताना गाडी पाठीमागून जाऊन जोरात धडकली, असा अंदाज पोलिसांकडून व्यक्त केला जात आहे.

...म्हणून मी पहाटे पोलीस ठाण्यात गेलो होतो; सुनील टिंगरे यांचे स्पष्टीकरण

Rahul Narwekar : 'यामिनी जाधव यांना खरंच मदत झाली का?' काय म्हणाले राहुल नार्वेकर

Lok Sabha Election 2024: एकाच तरुणानं केलं चक्क 8 वेळा मतदान; व्हिडीओ व्हायरल...

माजी नगरसेवकांचे अनोखे आंदोलन, नागरिकांच्या पाणी प्रश्नासाठी केले अनोखे आंदोलन

Daily Horoscope 22 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचे उत्पन्नाचे नवे मार्ग उघडणार; पाहा तुमचे भविष्य