Prashant Jagtap 
महाराष्ट्र

Prashant Jagtap: 'दोघांसमोर मी प्रस्ताव ठेवला आहे', सुप्रिया सुळेंच्या भेटीनंतर प्रशांत जगताप यांचं वक्तव्य

Maharashtra Politics: प्रशांत जगताप यांनी सुप्रिया सुळे यांच्याशी झालेल्या बैठकीत प्रस्ताव मांडल्याचे सांगितले. उद्या पुण्यात पत्रकार परिषदेत निर्णय जाहीर होणार आहे.

Published by : Dhanshree Shintre

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रशांत जगताप यांनी सुप्रिया सुळे यांच्याबाबत मोठा खुलासा केला आहे. "सुप्रिया ताई या आमच्या नेत्या आहेत आणि शरद पवारसाहेबांचे श्रद्धास्थान आहेत," असे जगताप म्हणाले. प्रांत शशिकांत शिंदे यांच्यासोबत झालेल्या बैठकीत त्यांनी दोघांसमोर प्रस्ताव ठेवला होता.

उद्या पुण्यात सुप्रिया ताई या प्रस्तावावर चर्चा होणार असून, पुण्यातच पत्रकार परिषद घेऊन निर्णय जाहीर केला जाईल, असे जगताप यांनी सांगितले. मुंबईतील पूर्वनियोजित दौरा रद्द करून सुप्रिया ताई पुण्यात येत आहेत. आम्ही तिघेजण उद्या पुन्हा बैठक करणार आहोत आणि त्यानंतर मी माझे मत जाहीर करणार आहे, असे त्यांनी नमूद केले.

"मला हसू आवरेना, मीही उमेदवार आहे," असे म्हणत जगताप यांनी हास्याच्या सूरात चिमटा काढला. "पुण्यात जाताना गाडी गरम झाली तर एसटी मिळते का हे पहावे लागेल," असे त्यांनी खोचकपणे सांगितले. गाड्या आता इथेनॉलच्या आलेल्या आहेत, असे सुप्रिया सुळे यांच्याबाबत अप्रत्यक्ष टोला लगावला.

जगताप यांनी स्पष्ट केले की, "माझ्यासाठी हा निर्णय घ्या असे मी म्हणणार नाही. उद्या कार्यकर्त्यांचे एकूण म्हणणे घ्यावे लागेल. नाराजी किंवा राग असण्याचे कारण नाही. मी माझे जे काही म्हणणे आहे ते उद्या मांडीन. मी सर्व पेपरवर लिहून दिलेले आहे." या निवेदनाने पक्षातील राजकीय घडामोडींमध्ये उत्सुकता वाढली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा