थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Pune ) मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणाने राज्यात खळबळ उडाली असून या प्रकरणात अनेक नव्या गोष्टी समोर येताना पाहायला मिळत आहे. पुण्यातील मुंढवा भागातील जमीन गैरव्यवहार प्रकरणातील आरोपी शीतल तेजवानीला न्यायालयात हजर करण्यात आले त्यानंतर तिला 11 डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
याच पार्श्वभूमीवर आता मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणात काल शीतल तेजवानीच्या घराची पुणे पोलिसांकडून झाडाझडती घेण्यात आली. यातच आता एक नवीन माहिती समोर येत आहे ती म्हणजे शीतल तेजवानीने वारसा समवेत केलेली पॉवर ऑफ अटॉर्नी गायब झाल्याची माहिती मिळत आहे. या पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये महत्त्वाची माहिती असल्याचे बोलले जात आहे.
Summery
पुणे मुंढवा जमीन घोटाळा प्रकरण
शीतल तेजवानीने वारसा समवेत केलेली पॉवर ऑफ अटॉर्नी गायब
पॉवर ऑफ अटॉर्नीमध्ये महत्त्वाची माहिती