महाराष्ट्र

Maharashtra Weather Update: राज्यात पुढील दोन दिवस पावसाचा अंदाज; 'या' जिल्ह्यांना यलो अलर्ट

Rain Update Yellow Alert: राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Published by : Team Lokshahi

Maharashtra Rain Update: राज्यात पुढील दोन दिवस हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. मराठवाडा आणि विदर्भात अवकाळी पावसाचा जोर दिसेल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. विदर्भात विजांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. यवतमाळमध्ये गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे पुन्हा शेतकऱ्यांवर संकट ओढवण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

राज्यात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे. त्यामुळे मुंबईला प्रदुषणापासून दिलासा मिळाला, तर मराठवाडा विदर्भातील पावसाच्या प्रतिक्षेत असलेल्या शेतपिकांनाही दिलासा मिळाला आहे. परंतु वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपिटीमुळे अनेक ठिकाणी शेतपिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वादळी वारा आणि गारपिटीमुळे हैराण असलेल्या उत्तर महाराष्ट्रात पुढील 24 तासांत अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. धुळे, नंदुरबार, जळगाव आणि नाशिक जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

आजही मराठवाड्यातील जालना, बीड, धाराशिव, लातूर, परभणी, हिंगोली, नांदेड या जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील अकोला, अमरावती, नागपूर आणि गोंदियासाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. अवकाळी पावसामुळं बळीराज्याच्या चिंतेत भर पडली असून यापूर्वी झालेल्या अवकाळीनं रब्बी पिकांना मोठा फटका बसला होता. अशातच आता पुन्हा अवकाळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा बळीराजावर आस्मानी संकट कोसळणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा