महाराष्ट्र

पावसाचा इशारा; अरबी समुुद्रातलं ‘ताऊते’ चक्रीवादळ ‘या’ किनारपट्टीवर धडकणार

Published by : Lokshahi News

पुढील चार दिवसात कोकण किनारपट्टीवर 'ताऊते' चक्रीवादळ धडकणार असून, या कालावधीत ताशी 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. येत्या आठवड्यात अरबी समुद्रात चक्रीवादळ धडकणार असल्याचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. त्यामुळे अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्यामुळे पुढील 24 तासांत त्याचे चक्रीवादळात रुपांतर होईल, असं हवामान खात्याकडून सांगण्यात आलं आहे.

महाराष्ट्राच्या किनारपट्टी परिसरात 15 ते 17 मे दरम्यान मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो, असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. तर कोकण आणि घाट परिसरात अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. तर राज्याच्या बहुतांश भागात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तर या आधी 14 मे पासून पुर्व मोसमी पावसाचा इशारा देण्यात आला होता.

हवामान खात्याच्या अंदाजानुसार, या कालावधीत रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यात ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सद्यःस्थितीत हे चक्रीवादळ पाकिस्तानच्या कराची जवळील समुद्रकिनार्‍यावर जमिनीवर पोहोचेल असा अंदाज आहे. तर हे चक्रीवादळ गुजरातच्या किनारपट्टीवर धडकण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. रत्नागिरी जिल्ह्यात 15 ते 16 या दोन तारखे दरम्यान पुढे सरकण्याची शक्यता आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Indian Woman Arrest USA : अमेरिकेत भारतीय महिलेला चोरीच्या आरोपाखाली अटक; पोलिसांच्या प्रश्नावर सोशल मीडियावर संताप

Ambadas Danve : "मी पुन्हा येईन...", विधान परिषदेतील अंबादास दानवेंचे निरोप भाषण चर्चेत

Indians Executed Abroad : 'या' देशात भारतीयांना सर्वाधिक फाशी ; निमिषा प्रिया प्रकरणानंतर आकडेवारी समोर

Israel Attack On Syria : सिरियातील लष्करी मुख्यालयावर इस्रायलचा हल्ला; तणाव वाढला