Sanjay Raut On Ajit Pawar : माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून अजित पवारांना राऊतांचा प्रश्न Sanjay Raut On Ajit Pawar : माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून अजित पवारांना राऊतांचा प्रश्न
महाराष्ट्र

Sanjay Raut On Ajit Pawar : माळेगाव साखर कारखान्याच्या चेअरमन पदावरून अजित पवारांना राऊतांचा प्रश्न

राऊतांचा सवाल: अजित पवारांच्या माळेगाव कारखान्याच्या चेअरमन पदावरून अर्थमंत्र्यांना 500 कोटी कुठून येणार?

Published by : Team Lokshahi

मुंबईमध्ये शिवसेनेचे ठाकरे गटाचे नेते संजय राऊतांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी सरकारवर ताशेरे ओढले. फक्त लोकांचे मत मिळवण्याच्या दृष्टीने निवडणुकांच्या आधी सामान्य नागरिकांना वचन देतात. त्यानंतर मात्र आपल्या धोरणांचा विसर पडतो. अश्या टोकांच शब्दांत राऊतांनी टीका केली. महायुती सरकार सत्ते आल्यापासून हे सरकार लाडक्या बहीणींना आणि शेतकऱ्यांना फसवत आले आहे. निवडणुकींच्यावेळी महायुती सरकराने लाडक्या बहीणीनां दरमहा 2100 रुपये तर, शेतकऱ्यांना ही कर्जमाफी देणार होते. परंतू सत्तेत आल्यापासून अजित पवारांना आपल्या वचनांचा विसर पडत आहे.

महाराष्ट्रात महायुती सरकार आल्यापासून 2000 हून अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. तरीही हे सरकार किती वाट पाहणार आहे. 1लाख शेतकऱ्यांच्या आत्महत्या होण्याची वाट पाहत आहे का? नेमंकी शेतकऱ्यांना कर्जमाफी कधी मिळणार आहे. प्रत्येक घरातला कर्ता पुरुष नाहक बळी देत आहे. कर्जमाफीची घोषणा करण्यासाठी अजून कितीवेळ सरकार वाट पाहणार आहे? राज्यातले सरकार प्रेताच्या टाळूचे लोणी खाणारे हे सरकार आहे. अशी जहरी टीका संजय राऊतांनी यावेळी केली आहे.

या पत्रकार परिषदेमध्ये राऊतांनी अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर ही निशाणा साधला आहे. कारखान्यातील निवडणुकीच्यासंदर्भात बारामतीमध्ये गेले 15 दिवस ठिय्या मांडून बसले आहेत. सर्व राज्यातील प्रश्न वाऱ्यावर सोडले आहेत. राज्यातील इतर कामांसाठी यांच्याकडे पैसे नाहीत, मात्र माळेगाव साखर कारखान्याचे चेअरमन केल्यास 500 कोटी रुपये उभे करतो असे सांगणारे राज्याच्या अर्थमंत्र्यांकडे इतके पैसे कुठून येणार ? असा खोचक सवाल राऊतांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : वाशिम जिल्ह्यात सलग 7 दिवसांपासून मुसळधार पाऊस

Ind Vs Eng Mohammed Siraj : इंग्लंडचा कार्यक्रम केला! मोहम्मद सिराजने इंग्लंडच्या 2 महत्त्वाच्या विकेट घेतल्या अन् पाहा काय झाल

Mobile Hang Problem: मोबाईल सतत होतोय हँग? जाणून घ्या कारण...

ITR फाइल करताना 'या' चुका कटाक्षाने टाळा, अन्यथा होऊ शकतो लाखोंचा दंड