महाराष्ट्र

Ganeshotsav 2022 : गणेश मूर्तीवरील उंचीची मर्यादा हटवली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम या सणावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे.

Published by : Shweta Chavan-Zagade

मागील दोन वर्षे करोनाच्या संकटामुळे साध्या पद्धतीने साजरा केला जाणारा गणेशोत्सव (Ganeshotsav) यंदाच्या वर्षी धूमधडाक्यात साजरा केला जाणार आहे. यंदाचा गणेशोत्सव, दहीहंडी तसेच मोहरम या सणावरील सर्व निर्बंध हटवण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यामध्ये गणेश मूर्तीच्या उंचीची मर्यादा मागे घेण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (eknath shinde) यांनी ही घोषणा केली आहे. गणेशोत्सव साजरी करताना आगमनाच्या रस्त्यावरचे सर्व खड्डे बुजवण्यात येणार असल्याची घोषणाही करण्यात आली आहे. गणेश मंडळांच्या रजिस्ट्रेशनसाठी एक खिडकी योजना राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.

मात्र या सणांबाबत हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टाचे जे आदेश आहेत त्याचं पालन मात्र करणं गरजेचं आहे, असे निर्देश मुख्यंमत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. सह्याद्री अतिथीगृह इथं या सार्वजनिक उत्सवांसंदर्भात विविध समन्वय समित्यांसोबत बैठक झाली. या बैठकीनंतर घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते.

गणेशोत्सव आणि दहीहंडी साजरी करताना काही नियमावलीचं पालन करावं लागणार आहे. मुंबईतील नियमावली संपूर्ण राज्यभरात लागू करण्यात येणार आहेत. कोविडमुळे मूर्त्यांच्या उंचीवर मर्यादा होती, ती मर्यादा यावेळी काढली आहे. तसेच मंडळ नोंदणीमध्ये सूट देण्यात आली आहे. सणांच्या काळात ज्यांच्यावर यासंबंधी काही छोटे-मोठे गुन्हे दाखल झाले होते. ध्वनिप्रदूषणासंबंधी ज्यांच्यावर गुन्हे नोंद करण्यात आले होते, त्यासंबंधीत अभ्यास करुन शक्य ते गुन्हे मागे घेण्यात येतील असं मुख्यमंत्री म्हणाले.

एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश

राज्यात गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करण्यासाठी एसटी प्रशासनाला जादा गाड्या सोडण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. परिवहन विभागास वाहतूक नियोजनाचे आदेश देण्यात आले आहे. प्रमुख महामार्गांवर वाहतूक कोंडी होऊ नये म्हणून महामार्ग पोलिसांनाही सूचना देण्यात आले आहे. यंदा 31 ऑगस्ट 2022 ते रविवार 9 सप्टेंबर 2022 या कालावधीत गणेशोत्सव साजरा होणार आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Chandu Mama on Raj- Uddhav Thackeray : उद्धव-राज ठाकरे एकत्र! चंदू मामा वैद्य यांच्या प्रयत्नांना यश

Mahesh Manjrekar : 'हे केवळ माझ्या मुलाखतीमुळे घडलं नाही..., ते एकत्र आले तर आनंदच'; ठाकरे बंधूंच्या एकत्र येण्यावर महेश मांजरेकर स्पष्टच बोलले

Latest Marathi News Update live :कार्यकर्त्यांनी सुशील केडियाचं ऑफिस फोडलं

Latest Marathi News Update live : ठाकरे बंधूंचा विजयी मेळावा