Brij Bhushan , Sanjay Raut and Raj Thackeray  team lokshahi
महाराष्ट्र

Sanjay Raut | "आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो"

संजय राऊतांचा राज ठाकरे आणि मनसे नेत्यांना टोला

Published by : Shweta Chavan-Zagade

मनसे नेत्यांनी शरद पवार (sharad pawar) यांच्यासोबतचा खासदार बृजभूषण यांचा फोटो शेअर केला होता. त्यानंतर या फोटोची चांगलीच चर्चा रंगली होती. यावर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी, आम्हीपण खासदार आहोत, आम्हीपण बृजभूषण अन् योगींसोबत जेवायला बसतो, तुम्ही जरा अभ्यास करत जा." असा टोला त्यांनी राज ठाकरे आणि मनसे नेत्यांवर लावला आहे.

बृजभूषण शरण सिंह यांना कोण ओळखत नाही? ते खासदार आहेत. आम्ही एकत्र बसतो, एकत्र जेवतो. फोटो व्हायरल झाले म्हणजे काय झालं? मनसेतील नेत्यांचा अभ्यास कच्चा आहे, त्यांनी संसदेचा अभ्यास करावा,' असा सल्ला संजय राऊत यांनी दिला आहे. तसंच एकाच सभागृहात लोक बसतात. आसपास असतात आणि चहापानही करतात. आम्ही योगींसोबतही चहापान करतो, म्हणून काय राज ठाकरेंना अडवण्यासाठी आम्ही योगींनाही रसद पुरवली का? असा खोचक सवाल करत राऊत यांनी मनसेचा समाचार घेतला आहे.

तसेच संजय राऊत यांनी भाजपाचे किरीट सोमय्या यांच्यावर टीका केली आहे. "किरीट सोमय्या हा भ्रष्ट माणूस आहे. त्याला मानहानीचा खटला दाखल केलाय तर त्याला दुसरं कामंच काय आहे? कितीचाही खटला दाखल करू द्या आम्हाला काय फरक पडत नाही." असं राऊत म्हणाले. "ज्याने देशाच्या संरक्षण व्यवस्थेशी संबंधित विक्रांत घोटाळा केला तो काय मानहानी करणार? तो आरोपी आहे, जामीनावर सुटलाय तो, तोंडानेच बोलतोय की दुसऱ्या कोणत्या अवयवाने बोलतोय काय माहिती?" अशी बोचरी टीका राऊतांनी सोमय्या यांच्यावर केली आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा