महाराष्ट्र

Sanjay Raut: ठाकरे सरकार कोसळल्यानंतर संजय राऊतांचा मोठा निर्णय!

Published by : Shweta Chavan-Zagade

एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर राज्य सरकार अल्पमतात आलं होतं. तर, राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governor Bhagat Singh Koshyari) यांनी उध्दव ठाकरे यांना बहूमताची चाचणी करण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर आता उध्दव ठाकरे (Uddhav Thackeray Resigns) यांनी राजीनामा दिलाय. याचदरम्यान शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांनीही मोठी घोषणा केली आहे. मी उद्या दुपारी चौकशीसाठी सक्तवसुली संचलनालयासमोर अर्थात ED समोर हजर होणार असल्याचे त्यांनी म्हटले.

मी ईडीसमोर हजर होऊन माझी भूमिका मांडेन. मला पक्षाच्या कामापासून रोखण्यासाठी हे सगळे दबाव सुरु आहेत. केंद्रीय यंत्रणांच्या याच दबावामुळे आमच्या पक्षातील काहीजण पळून गेले. पण मी उद्या दुपारपर्यंत ईडीसमोर चौकशीसाठी हजर होईन. माझ्यावर कोणतीही कारवाई झाली तरी मी त्याला सामोरा जाईन, असे संजय राऊत (sanjay raut) यांनी सांगितले. ते गुरुवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते.

यावेळी संजय राऊत यांनी शिवसेनेतील बंडखोर आमदारांवर पुन्हा एकदा टीकास्त्र सोडले. उद्धव ठाकरे यांच्या पाठीत त्यांच्यात लोकांनी खंजीर खुपसला. ठाकरेंना कधीच सत्तेची लालसा नव्हती. काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांनी त्यांना मुख्यमंत्रीपद सांभाळण्याची विनंती केली, त्यामुळे त्यांनी हे पद स्वीकारले. आज शिवसेनेतील बंडखोर हे महाविकास आघाडी आणि शरद पवार यांना दोष देत आहेत. पण या सगळ्यांना महाविकास आघाडीच्या मंत्रिमंडळात चांगली खाती मिळाली होती. तेव्हा यापैकी कोणीही विरोध केला नव्हता. महाविकास आघाडी सरकार हा राज्यातील वेगळा प्रयोग आहे, अशी प्रतिक्रिया या सर्वांनी तेव्हा व्यक्त केली होती. हा प्रयोग महाराष्ट्रात पुढील २५ वर्ष चालायला हवा, अशी वक्तव्य या नेत्यांकडून केली जात होती. मात्र आता पाठीत खंजीर खुपसण्यासाठी कारणे शोधली जात आहेत,' असं म्हणत संजय राऊत यांनी बंडखोर शिवसेना नेत्यांवर निशाणा साधला आहे.

"शरद पवार आणि मला दोष कशासाठी देता"

शिवसेनेतील बंडखोरांना आता पाठीत खंजीर खुपसायचा होता, म्हणून ते काहीही कारणं देत आहेत. हे लोक शरद पवार यांना का दोष देत आहेत? यापैकी बहुसंख्य लोकांचं पालनपोषण आणि त्यांनी शरद पवार यांनीच मोठं केलं आहे. हे लोक केवळ मंत्रिपदासाठी शिवसेनेत आले होते. तरी हाडाचे शिवसैनिक गेल्याचे दु:ख आम्हाला असल्याची सल संजय राऊत यांनी बोलून दाखवली.

RCB VS CSK: आरसीबीने 27 धावांनी विजय मिळवून प्लेऑफमध्ये केली दमदार एन्ट्री

Megablock: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी! मध्य रेल्वेवर 15 दिवस मेगाब्लॉक; तर काही गाडया रद्द

साताऱ्यातील मिनी काश्मीर आणि महाबळेश्वरमध्ये बरसला अवकाळी पाऊस

IPL 2024 : रोहित शर्मा मुंबई इंडियन्समधून बाहेर पडणार? MI च्या मुख्य प्रशिक्षकाला हिटमॅनने स्पष्टच सांगितलं, म्हणाला...

"उबाठा पक्ष काँग्रेसमध्ये आधीच विलीन झालाय"; उद्योगमंत्री उदय सामंत यांचा मोठा दावा