(Satara Heavy Rain ) राज्यभरात पावसाचा जोर कायम असून हवामान विभागाने विविध जिल्ह्यांत वादळी वाऱ्यांसह पावसाचा इशारा दिला आहे. सातारा जिल्ह्यात पावसाचा कहर पाहायला मिळत आहे. गेल्या 48 तासांपासून सुरू असलेल्या संततधार पावसाने संपूर्ण जिल्ह्याचे जनजीवन विस्कळीत केलं आहे.
पुढील 48 तासांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आल्याची माहिती मिळत आहे. गेल्या 24 तासांत महाबळेश्वरमध्ये विक्रमी 150 मिमी पावसाची नोंद झाली आहे. आत्तापर्यंत एकूण 655 मिमी पाऊस पडला असल्याची माहिती मिळत आहे.
कोयना, तापोळा, महाबळेश्वर, कांदाटी आणि सोळशी या भागांमध्ये पावसाने जोरदार तडाखा दिला असून कोयना धरणात 28 टीएमसी साठा झाला आहे. याच पार्श्वभूमीवर आता 20 जून ते 19 ऑगस्ट दरम्यान साताऱ्यात पर्यटनावर बंदी घालण्यात आली आहे.