SIDDHIVINAYAK TEMPLE CLOSED JANUARY 7–11 FOR SINDOOR LEPAN AND RELIGIOUS RITUALS 
महाराष्ट्र

Siddhivinayak Temple Closed: महत्त्वाची बातमी! सिद्धिविनायक मंदिर पाच दिवसासाठी बंद, नेमकं कारण काय? वाचा सविस्तर

Temple Rituals: मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक मंदिर ७ ते ११ जानेवारी दरम्यान सिंदूर लेपनासह धार्मिक विधीसाठी बंद राहणार आहे. या काळात मूर्ती दर्शन उपलब्ध नसणार, परंतु प्रतिमूर्तीचे दर्शन होईल.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

मुंबईतील प्रसिद्ध सिद्धिविनायक गणपती मंदिरात दररोज हजारो भाविक दर्शनासाठी येतात. या मंदिराने भाविकांना माहिती देताना सांगितले आहे की, ७ ते ११ जानेवारी या कालावधीत मंदिर बंद राहील. परंतू नेमकं मंदिर का बंद करण्यात येत आहे आणि का ते जाणून घ्या.

दरम्यान, या काळात मूर्तीला सिंदूर लेपन आणि इतर आवश्यक विधी पूर्ण केले जातील. सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, लाखो भाविक दूरदूरून येथे दर्शनासाठी येतात. त्यांच्या सोयीचा विचार करून आगाऊ सूचना दिल्या आहेत. या काळात भाविकांना श्रींच्या प्रत्यक्ष मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही, पण प्रतिमूर्तीचे दर्शन उपलब्ध असेल. ट्रस्टच्या कार्यकारी अधिकारी वीणा पाटील यांनी भाविकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे.

श्री सिद्धिविनायक गणपती मंदिर हे मुंबईतील एक प्रमुख हिंदू तीर्थक्षेत्र आहे. हे मंदिर मूळचे लक्ष्मण विठू आणि देउबाई पाटील यांनी १९ नोव्हेंबर १८०१ रोजी बांधले होते. आज हे मुंबईतील श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे. दरवर्षी सिंदूर लेपनाच्या विधीसाठी मंदिर बंद केले जाते, ज्यामुळे भाविकांची गर्दी वाढते.

सिंदूर लेपनाचा विधी पूर्ण झाल्यानंतर सोमवार १२ जानेवारी २०२६ रोजी सकाळी प्रोक्षणविधी, नैवेद्य आणि आरती पार पडेल. त्यानंतर दुपारी ठीक १.०० वाजता गाभाऱ्यातून नेहमीप्रमाणे दर्शन सुरू होईल. भाविकांनी या बदलाची नोंद घेऊन सहकार्य करावे, असे ट्रस्टने सांगितले आहे.

  • सिद्धिविनायक मंदिर ७ ते ११ जानेवारी दरम्यान वार्षिक सिंदूर लेपन विधीसाठी बंद राहणार.

  • या काळात मूर्तीचे प्रत्यक्ष दर्शन शक्य नसून प्रतिमूर्ती दर्शन उपलब्ध असेल.

  • मंदिर ट्रस्टचे कार्यकारी अधिकारी वीणा पाटील भाविकांचे सहकार्य मागितले.

  • १२ जानेवारी रोजी प्रक्षोभन विधी, नैवेद्य आणि आरती पार पडल्यावर नियमित दर्शन सुरू होईल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा