थोडक्यात
पवई परिसरात रोहित आर्यने 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं
रोहित आर्य प्रकरणी 15 -16 जणांचे नोंदवले जबाब
स्टुडिओतील स्टाफ,पालक,मुलांच्या जबाबाचा समावेश
(Rohit Arya Case) मुंबईतील पवई परिसरात एका व्यक्तीनं तब्बल 17 लहानग्यांसह 20 जणांना ओलीस ठेवलं होतं. रोहित आर्य असे त्या व्यक्तीचं नाव होते. पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत तातडीने कारवाई करत काही तासांतच सर्व मुलांची सुखरूप सुटका केली.
या प्रकरणानंतर संपूर्ण परिसरात प्रचंड गोंधळ उडाला. त्याने सोशल मीडियावर याबाबतचा एक व्हिडीओ देखील शेअर केला होता. पोलीस स्टुडिओच्या बाथरूममधून आत शिरले. यावेळी रोहित आर्य आणि पोलिसांमध्ये चकमक झाली आणि या चकमकीत आरोपी जखमी झाला. आरोपीला तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. पण, आरोपीचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
या प्रकरणी आता 15 -16 जणांचे नोंदवले जबाब नोंदवण्यात आल्याची माहिती मिळत आहे. यात एन्काऊंटर करणाऱ्या सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल वाघमारे यांच्याही नावाचा समावेश आहे. गुन्हे शाखेच्या पोलिसांनी आरोपी रोहित आर्या आणि वाघमारे यांचे कपडे तसेच वाघमारे यांची गुन्ह्यात वापरलेली पिस्तूलही न्याय वैद्यकीय प्रयोग शाळेला पाठवली असल्याची माहिती मिळत आहे. गुन्हे शाखेकडून आतापर्यंत नोंदवण्यात आलेल्या जबाबांमध्ये स्टुडिओत उपस्थित असणारा स्टाफ, पोलीस, काही पालक आणि उपस्थित मुलांच्या समावेश आहे.