महाराष्ट्र

Student Suicide | FTII मध्ये विद्यार्थ्यांची गळफास घेऊन आत्महत्या

पुण्यातील एफटीआयआय ( फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली.

Published by : Team Lokshahi

अमोल धर्माधिकारी | पुणे : पुण्यातील एफटीआयआय ( फिल्म इन्स्टिट्यूट ऑफ टेलिव्हिजन) मध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. (Student Suicide) आज (5 ऑगस्ट) सकाळी 9:00 वाजण्याच्या सुमारास हा प्रकार उघडकीस आला. अश्विन शुक्ला असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याचे नाव आहे. आत्महत्या केल्याची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

याप्रकरणी अधिक माहिती अशी की, पुण्यातील लॉ कॉलेज रस्त्यावर असणाऱ्या एफटीआयमध्ये एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची माहिती डेक्कन पोलिसांना मिळाली. त्यानंतर डेक्कन पोलीस स्टेशनचे मार्शल घटनास्थळी दाखल झाले. आश्विन एफटीआयआयमधील बॉईज हॉस्टेलमध्ये राहत होता. अश्विन शुक्ला हा मूळचा गोवा येथील आहे. एफटीआयआयमध्ये तो शेवटच्या वर्षाला शिक्षण घेत होता. त्याने आत्महत्या का केली हे मात्र अद्याप स्पष्ट झाले नाही. आत्महत्येची माहिती मिळाल्यानंतर डेक्कन पोलीस आणि फायर ब्रिगेडचे जवान घटनास्थळी दाखल झाले होते आणि या घटनेचा तपास सुरु आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा