अनिल घोडविंदे | मुंबईला पाणी पुरवठा करणारे तानसा धरण भरण्याच्या उंबरठ्यावर आले आहे. मुसळधार पाऊस सुरु असल्याने हे धरण कोणत्याही क्षणी भरण्याची शक्यता असल्याने नदी काठच्या 33 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
शहापूर तालुक्यातील तानसा हे प्रमुख धरण असून या धरणाची आजची पाण्याची पातळी 125.55 मीटर टीएचडी आहे तर धरण भरून वाहण्याची क्षमता 128.63 मीटर्स टीएचडी असून सदर धरण भरून वाहण्यासाठी फक्त 3 मीटर पाण्याची आवश्यकता आहे. तसेच धरण परिसरात पाऊसाची संततधार कायम सुरू असून आज रात्री धरण भरून वाहण्याची शक्यता असल्यामुळे तानसा नदी काठावरील शहापूर,भिवंडी,वाडा,वसई, तालुक्यातील 33 गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासना मार्फत देण्यात आला आहे.