महाराष्ट्र

शिक्षकांच्या बदल्या रद्द होणार? केसरकरांचे महत्वपूर्ण विधान

20 हजार आणि त्यानंतर 30 हजार शिक्षक भरती केली जाणार : दीपक केसरकर

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार असते. त्यामुळं शिक्षकांची ज्या ठिकाणी नियुक्ती झाली ते तिथंचं कायमस्वरूपी राहतील, असं विधान मंत्री दीपक केसरकर यांनी केलं आहे. सोबतच राज्यातील शिक्षकांच्या बदल्या रद्द करता येतील का? यावर सरकरचा विचार सुरू असल्याचं महत्वपूर्ण विधान त्यांनी केले आहे.

शिक्षकांवर बदलीची टांगती तलवार असते. शिक्षक बदल्या रद्द करता येतील का अशी माझी भूमिका आहे. हा निर्णय मी एकटा घेऊ शकत नाही. 20 हजार आणि त्यानंतर 30 हजार शिक्षक भरती केली जाणार आहे. त्यामुळे शिक्षकांची ज्या ठिकाणी नियुक्ती झाली आहे ते तिथेच कायमस्वरूपी राहतील, असे दीपक केसरकर यांनी सांगितले आहे.

शाळेत मुलांची संख्या वाढेल पण आमच्यासाठी शिक्षणाचा दर्जा कसा वाढेल हे आमचं ध्येय आहे. ट्रान्सफर होणारी मुलं आहेत त्यांना सेंटर बोर्ड सगळीकडे असावं यासंदर्भात अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. यावर अद्याप ठाम निर्णय घेतलेला नाही. सीबीएसई बोर्डसारख्या फॅसिलिटी देता येतील का याबाबत चर्चा करतोय. काही इंग्रजी शाळा आपण चालवू शकतो का याबाबत विचार सुरू आहे पण मराठीसाठी दुय्यम वागणूक नाही. मराठी शाळांचे प्रमाण वाढेल याचे प्रयत्न आमचे आहेत, असेही दीपक केसरकर यांनी म्हंटले आहे.

दरम्यान, जळगावमध्ये काल उध्दव ठाकरेंची सभा पार पडली. यावेळी उध्दव ठाकरेंनी शिंदे गटावर जोरदार टीका केली. यावरुन दीपक केसरकरांनी ठाकरे गटावर निशाणा साधला आहे. आमदारांच्या बद्दल खोटं संभ्रम निर्माण करा. त्यानंतर ते महाराष्ट्रात फिरले. आता कोर्टाचा निकाल विरोधात लागेल असं बोलत आहेत. सर्वांचे वक्तव्य समान आहेत. सल्लागार आहेत त्यांनी ही स्ट्रॅटेजी दिली आहे. असे हायर करता येतात. आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून माहिती मिळाली आहे, असा दावा केसरकरांनी केला आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Malnourished Children : राज्यात कुपोषित बालकांचा आकडा धडकी भरवणारा ; महिला आणि बालविकास मंत्र्यांची माहिती

Deepika Padukone : दीपिका पदुकोण हॉलिवूडमध्ये इतिहास रचणार! 'Walk of Fame'वर स्थान मिळवणारी पहिली भारतीय अभिनेत्री

Shubman Gill : शुभमन गिलचे इंग्लंडमध्ये ऐतिहासिक दुहेरी शतक; भारतीय क्रिकेटसाठी नवा अध्याय

Kandivali Crime News : गुजराती अभिनेत्रींच्या मुलाने 57 व्या मजल्यावरून उडी घेत स्वतःचे जीवन संपवले