महाराष्ट्र

विमान प्रवासाचा अनुभव देणारी 'वंदे भारत एक्सप्रेस’ आहे फारच खास; जाणून घ्या याबद्दल

Published by : Shweta Shigvan-Kavankar

नागपूर : हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गचं उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले आहे. यासोबतच नागपूर ते बिलासपूर या वंदे भारत रेल्वेचा शुभारंभही मोदींच्या हस्ते करण्यात आले आहे. आज वंदे भारतला पंतप्रधान मोदी हिरवा झेंडा दाखवला. यानंतर वंदे भारत ट्रेनचे बुकींग सर्वसामन्यांसाठी खुले होईल.

कशी असेल नेमकी 'ही' रेल्वे?

ही देशातील सहावी तर महाराष्ट्रातील दुसरी वंदे भारत एक्सप्रेस ठरणार आहे.

(३० सप्टेंबर २०२२ रोजी मुंबई सेंट्रल-अहमदाबाद ही देशातील तिसरी व महाराष्ट्रातील पहिली वंदेभारत एक्सप्रेस धावली)

स्वदेशी बनावटीची वंदे भारत एक्सप्रेस ही भारतीय अभियंत्यांच्या क्षमतेची साक्ष आणि मेक इन इंडिया उपक्रमाचा नवा कळस आहे.

या एक्सप्रेस गाडीच्या माध्यमातून महाराष्ट्राची उपराजधानी नागपूर आणि छत्तीसगडची राजधानी रायपूर आणि बिलासपूर ही महत्वाची शहर जोडली जाणार.

नागपूर - बिलासपूर एकूण अंतर: ४१२ कि.मी. प्रवास वेळ : ५.३० तास

उभय शहरांदरम्यान आठवड्यातून ६ वेळा धावणार. वंदे भारत एक्सप्रेस (शनिवारी सेवा बंद असणार)

गाडीला एकूण १६ कोच असून प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांच्या माहितीसाठी ३२ इंचीच्या डिजिटल स्क्रिन.

प्रवासी घेणार वेगवान व सुरक्षित प्रवासाचा अनुभव. विमान प्रवासाची प्रचिती घेतानाच 'कवच' या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग करून या एक्सप्रेस गाडीत सर्वोत्तम सुरक्षा व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रत्येक कोचमध्ये प्रवाशांची माहिती आणि इंफोटेनमेंट उपलब्ध.

दिव्यांग प्रवाश्यांची काळजी घेण्यात आली असून ठिकठिकाणी ब्रेल लिपीतून माहिती व सूचना देण्यात आल्या आहेत.

टच फ्री सुविधांसह व्हॅक्यूम प्रसाधनगृह, उच्च कार्यक्षमतेच्या कंप्रेसरद्वारे उत्कृष्ट वेंटिलेशन आणि वातानुकूलन नियंत्रण.

"पहिल्या चार टप्प्यातच आम्ही महाविकास आघाडी आणि इंडिया आघाडीचा सुफडा साफ केला "; उपमुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा दावा

मोठी बातमी! घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील मुख्य आरोपी भावेश भिंडेला उदयपूरमधून अटक

World Hypertension Day 2024 : 'जागतिक उच्च रक्तदाब दिवस' कधी आणि का साजरा केला जातो?

"४ तारखेनंतर टरबूजचा भाव उतरणार आहे"; उद्धव ठाकरेंची उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांवर घणाघाती टीका

Daily Horoscope 17 May 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांना साडेसातीचाही होणार त्रास; पाहा तुमचे भविष्य