महाराष्ट्र

वडापाव महागणार? पावाच्या किंंमती वाढल्या

खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असेलला आणि गरीबांचा बर्गर म्हणून ओळखाला जाणारा वडापाव आता महागणार आहे. पावाचे दर वाढल्याने वडापाव महगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

मुंबई : खाद्यसंस्कृतीचा अविभाज्य भाग असेलला आणि गरीबांचा बर्गर म्हणून ओळखाला जाणारा वडापाव आता महागणार आहे. पावाचे दर वाढल्याने वडापाव महगण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे वडापावच्या दरात 3 ते 4 रुपयांनी वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईकरांचं लोकप्रिय वडापाव लहानग्यांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वानाच जवळचा वाटतो. मध्यमवर्गीय, चाकरमान्यांच्या पोटाला आधार देणाऱ्या वडापावलाही आता महागाईची झळ बसली आहे. दोन-तीन रुपये किमतीपासून सुरु झालेला वडापावचा प्रवास 20 रुपयांपार्यंत पोहचला आहे. परंतु, आता पावच्या दरात वाढ झाल्याने वडापाव महागण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पावाचे दर 50 पैशांनी वाढले असून या वर्षातली ही तिसरी वाढ आहे. यामुळे वडापावचे दर 3 ते 4 रुपयांनी वाढण्याची शक्यता आहे. पाव महागल्यामुळे वडापावसह आता मिसळपाव, पावभाजी यांचे दरही वाढण्याची शक्यता आहे. यामुळे मुंबईकरांचा वडापाव महागल्याने चाकरमानी आणि मध्यमवर्गीयांच्या तोंडाला महागाईचा चटका बसणार आहे.

दरम्यान, याआधीही चणा डाळ व तेलाच्या किंमती वाढल्याने वडापाव महाग झाला होता. वडापाव बनवण्यासाठी लागणाऱ्या कच्चा मालाच्या किंमती वाढल्या आहेत. त्यामुळे वडापाव आता असलेल्या किंमतींमध्ये विकणे परवडेनासे झाले आहे. यामुळे वडापावच्या किंमती वाढविण्यात आल्या होत्या.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा