महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या ‘शिवतीर्थ’वर पाहुण्यांची मांदियाळी

Published by : Lokshahi News

काही दिवसांपूर्वीच मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर 'शिवतीर्थ' या आपल्या नवीन निवासस्थानात गृहप्रवेश केला. त्यांच्या या नवीन घरी अनेक राजकीय मंडळी सदिच्छ भेट घेत आहेत. राज ठाकरे हे कृष्णकुंजवर राहत होते. पण, त्यांनी कृष्णकुंजशेजारीच शिवतीर्थ हे घर बांधलं आहे

काही दिवसांपूर्वीच माजी क्रिकेटर सचिन तेंडूलकर यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. त्या भेटीचा व्हिडिओ आणि फोटोही व्हायरल झाले होते. त्यानंतर, शिवसेना नेते संजय राऊत यांनी शिवतीर्थवर जाऊन राज ठाकरेंची भेट घेतली होती. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांनीही आपल्या पत्नीसोबत राज ठाकरेंची शिवतीर्थवर भेट घेतली.

राज ठाकरेंच्या नव्या घरी आता अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांनीही राज ठाकरेंची भेट घेऊन भोजनाचा आस्वाद घेतला. त्या भेटीचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Maharashtra Assembly Monsoon Session : आज पावसाळी अधिवेशनाचं सूप वाजणार; अंतिम आठवडा प्रस्तावावर सभागृहात होणार चर्चा

Raj Thackeray : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज मिरा रोडमध्ये सभा; काय बोलणार याकडे सर्वांचे लक्ष

Latest Marathi News Update live : मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज मिरा रोडमध्ये

Aajcha Suvichar - आजचा सुविचार