GramPanchayat election  Team Lokshahi
महाराष्ट्र

18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकांच्या तारखांमध्ये बदल, राज्य निवडणूक आयोगाची माहिती

18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींसाठी पार पडणार निवडणुक

Published by : Sagar Pradhan

राज्यात नुकताच 495 ग्रामपंचायतचे निकाल जाहीर झाले. त्यानंतर लगेच 18 जिल्ह्यांतील ग्रामपंचायत निवडणुकींसाठी तारीखा जाहीर करण्यात आल्या होत्या. मात्र, विविध 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी 13 ऑक्टोबर 2022 ऐवजी आता 16 ऑक्टोबर 2022 रोजी मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे.

तर मतमोजणी 14 ऑक्टोबर ऐवजी आता 17 ऑक्टोबरला होईल. अशी माहिती राज्य निवडणूक आयोगाने प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिली आहे. त्यात सदस्यपदांसह थेट सरपंचपदाचाही समावेश आहे. सुधारित कार्यक्रमानुसार 16 ऑक्टोबर 2022 रोजी सकाळी 7. 30 ते सायंकाळी 5. 30 या वेळेत मतदान होईल. नक्षलग्रस्त भागात दुपारी 3 वाजेपर्यंतच मतदानाची वेळ असणार आहे. मतमोजणी 17 ऑक्टोबर 2022 रोजी होईल. या निवडणुकीत सुद्धा सरपंचपदाची निवडणूक थेट जनतेतून होणार आहे.

ग्रामपंचायतींची जिल्हा व तालुकानिहाय संख्या:

ठाणे: कल्याण- 7, अंबरनाथ- 1, ठाणे- 5, भिवंडी- 31, मुरबाड- 35, व शहापूर- 79.

पालघर: डहाणू- 62, विक्रमगड- 36, जवाहार- 47, वसई- 11, मोखाडा- 22, पालघर- 83, तलासरी- 11 व वाडा- 70.

रायगड: अलिबाग- 3, कर्जत- 2, खालापूर- 4, पनवेल- 1, पेण- 1, पोलादपूर- 4, महाड- 1, माणगाव- 3 व श्रीवर्धन- 1.

रत्नागिरी: मंडणगड- 2, दापोली- 4, खेड- 7, चिपळूण- 1, गुहागर- 5, संगमेश्वर- 3, रत्नागिरी- 4, लांजा- 15 व राजापूर- 10.

सिंदुदुर्ग: दोडामार्ग- 2 व देवडगड- 2.

नाशिक: इगतपुरी- 5, सुरगाणा- 61, त्र्यंबकेश्वर- 57 व पेठ- 71.

नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.

पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.

सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.

कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.

अमरावती: चिखलदरा- 1. वाशीम: वाशीम- 1.

नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.

वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.

चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.

भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.

गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2. गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1.

एकूण 1,165 ग्रामपंचायतीसाठी ही निवडणूक पार पडणार आहे .

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?