थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...
( Manikrao Kokate ) माणिकराव कोकाटे पुन्हा एकदा अडचणीत आले आहेत. सदनिका गैरव्यवहार प्रकरणात सत्र न्यायालयाने मोठा निर्णय देत शासकीय कोट्यातील 10 टक्के सदनिका गैरव्यवहार प्रकरणी दोन वर्षाची शिक्षा आणि 10 हजार दंडाची शिक्षा जिल्हा सत्र न्यायालयात कायम ठेवण्यात आली आहे.
या न्यायालयीन निर्णयामुळे कोकाटे यांच्यावर अटकेची टांगती तलवार उभी राहिली आहे. क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंनी राजीनामा दिला असून आता या खात्याचा पदभार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे असणार आहे. माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा अजित पवार यांनी स्वीकारला असून राजीनाम्याचे पत्र आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सोपवण्यात आल्याची माहिती मिळत आहे.
याच पार्श्वभूमीवर आता माणिकराव कोकाटेंना रुग्णालयातून कधी डिस्चार्ज मिळणार याकडे लक्ष लागले आहे. आज मुंबईतील रुग्णालयात कोकाटेंवर 'कोरोनरी अँजिओप्लास्टी' चाचणी केली जाणार आहे. या चाचणीच्या अहवालानंतरच त्यांना डिस्चार्ज द्यायचा की नाही, याचा निर्णय डॉक्टर घेणार आहेत.
अँजिओग्राफीच्या रिपोर्ट नंतरच डॉक्टर आणि पोलिसांची चर्चा होऊन त्यांच्यावर पुढची कारवाई होणार असल्याची माहिती मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात आहे.
Summery
माणिकराव कोकाटेंना डिस्चार्ज कधी मिळणार?
नाशिक पोलिसांचा फौजफाटा रुग्णालयात तैनात
डॉक्टरांसोबत पोलिसांची चौकशी सुरू