थोडक्यात
पुण्यात कोथरूडमध्ये मध्यरात्री गोळीबार,एकजण गंभीर जखमी
प्रकाश धुमाळ असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव
गोळीबार प्रकरणातील पाच आरोपींना अटक
(Pune) पुण्यात मध्यरात्री गोळीबार झाल्याची घटना घडली आहे. पुण्याच्या कोथरुडमध्ये ही घटना घडली असून यामध्ये एकजण गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. प्रकाश धुमाळ असे गोळीबार झालेल्या व्यक्तीचे नाव असून त्याला खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
या व्यक्तीच्या मानेला आणि मांडीला गोळी लागल्याची माहिती मिळत असून यावेळी तीन राउंड फायर करण्यात आले. कोथरूडच्या शिंदे चाळ जवळ ही फायरिंग झाली असून घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
याच पार्श्वभूमीवर आता या गोळीबार प्रकरणातील पाच आरोपीना अटक करण्यात आल्याची माहिती मिळत असून कोथरूड पोलिसांनी ही अटक केली आहे. मयूर कुंभार, मुसा शेख, रोहित अखाड, गणेश राऊत यासह आणखी एकाला अटक करण्यात आली आहे.