Mumbai Garbage Vehicle 
मुंबई

Mumbai Garbage Vehicle : कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा; कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप

एकाच कंपनीला कंत्राट देणामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त कामगार नेते बाबा कदम यांचा आरोप

Published by : Siddhi Naringrekar

थोडक्यात

  • कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा

  • कचरा वेचक कर्मचाऱ्यांचा आरोप

  • एकाच कंपनीला कंत्राट देणामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त कामगार नेते बाबा कदम यांचा आरोप

(Mumbai) मुंबईतले सफाई कामगार हे स्वच्छता दूत समजले जातात. संपूर्ण मुंबई स्वच्छ ठेवण्याचं काम या कर्मचाऱ्यांवर असतं. रोज सकाळी मोठ्या ट्रेलरवरून कचरा गोळा करताना आपण या कर्मचाऱ्यांना पाहत असतो. मात्र रोज मुंबई स्वच्छ करणारे कर्मचारी सध्या अडचणीत आले आहेत. ज्या मोठ्या गाड्यांवर हे कर्मचारी काम करतात त्या गाड्यांची दुरवस्था झालीय.

त्यामुळे या गाड्यांचा जर अपघात झाला किंवा काम करताना कर्मचाऱ्यांबरोबर एखादी दुर्घटना घडली तर त्याला जबाबदार कोण? त्यामुळे या सफाई कर्माचाऱ्यांना न्याय कधी मिळणार हे देखील महत्त्वाचे आहे. मुंबई महानगरपालिकेने आमच्या सुरक्षा कडे लक्ष द्यावं अशी मागणी देखील कर्मचारी करताना पाहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेतील कचरा वेचक कर्मचा-यांचं आयुष्य धोक्यात असून धोकादायक कचरा वेचक गाड्यांच कॉंन्ट्रॅक्ट संपवलं असले तरी 15 वर्ष केवळ एकाच व्यक्तीला कॉंन्ट्रॅक्ट दिलं जात असल्याची माहिती मिळत आहे. कचरा संकलनामध्ये 3 हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा कचरा वेचक कर्मचाऱ्यांकडून आरोप करण्यात येत आहेत.

तसेच वारंवार एकाच कंपनीला कंत्राट देण्यामागे राजकीय मंडळींचा वरदहस्त असल्याचा आरोप कामगार नेते बाबा कदम यांनी केला आहे. याच पार्श्वभूमीवर आता ते लाडके नेते कोण आहेत. असा सवाल आता उपस्थित केला जात आहे. तसेच या सफाई कर्मचाऱ्यांना न्याय मिळणार का? हे पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा