Mumbai 
मुंबई

Mumbai : कर्नाक उड्डाणपुलाचे नाव आता 'सिंदूर पूल'; उद्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन

दक्षिण मुंबईमधील मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाचे नामांतर करून आता त्याचे नाव 'सिंदूर पूल' असे ठेवण्यात येणार आहे.

Published by : Team Lokshahi

(Mumbai) दक्षिण मुंबईमधील मस्जिद बंदर येथील कर्नाक पुलाचे नामांतर करून आता त्याचे नाव 'सिंदूर पूल' असे ठेवण्यात येणार आहे. उद्या सकाळी 10 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुलाचे उद्घाटन होणार असून यामुळे गेल्या 10 वर्षांपासून चालत असलेल्या पूर्व आणि पश्चिम मुंबईमधील वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांची सुटका होणार आहे.

150 वर्ष जुना असलेला हा कर्नाक पूल 2022 मध्ये पाडण्यात आला होता. त्यानंतर बीएमसीकडून मध्य रेल्वेच्या आराखड्यानुसार हा पूल परत नव्याने बांधण्यात आला. मात्र हा पूल तयार झाल्यानंतरही वाहतुकीसाठी खुला न केल्यामुळे शिवसेना आणि मनसे कार्यकर्त्यांनी तिथे आंदोलनही केले होते.

हा पूल वाहनधारक आणि पादचाऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचा आहे. दक्षिण मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मस्जिद बंदर आणि मोहम्मद अली मार्ग परिसरातील वाहतुकीसाठी हा पूल महत्त्वाचा आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Dhurandhar Film : रणवीर सिंहच्या ‘धुरंधर’ चित्रपटात ‘राहुल गांधी’ नाव पाहून गोंधळ; जाणून 'घ्या' Fact Check

Teachers Protest : अधिवेशन संपेपर्यंत शिक्षकांच्या खात्यात जमा होणार इतका पगार; गिरीश महाजन यांनी दिले आश्वासन

Ambernath Viral Video : लिफ्ट बंद केल्याच्या रागातून 12 वर्षीय मुलाला बेदम मारहाण; अंबरनाथमधील CCTV Footage Viral

Latest Marathi News Update live : मंत्री गिरीश महाजन आझाद मैदानात शिक्षक आंदोलकांच्या भेटीला